२० अधिकाऱ्यांची धडक कारवाईमास्क न बांधणाऱ्यांना जागीच दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 05:00 AM2020-09-25T05:00:00+5:302020-09-25T05:00:38+5:30

दक्षता ही सद्यस्थितीत प्रत्येकाची जबाबदारी आहे. कारवाईची वेळच येऊ देऊ नका, असे आवाहन प्रशासनाद्वारे वारंवार केले जात आहे. तरीही अनेक बेजबाबदार नागरिक मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी फिरत असल्याचे आढळून येत आहे. कोरोना साथीच्या नियंत्रणासाठी अशा बेशिस्त नागरिकांना शिस्त लावण्यासाठीच कारवाईची विशेष मोहीम प्रशासनाने हाती घेतली आहे.

20 officers fined on the spot for not wearing action mask | २० अधिकाऱ्यांची धडक कारवाईमास्क न बांधणाऱ्यांना जागीच दंड

२० अधिकाऱ्यांची धडक कारवाईमास्क न बांधणाऱ्यांना जागीच दंड

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकारीही रस्त्यावर : चार तासांत १६८ नागरिकांकडून ५३ हजार ३०० वसूल

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हाधिकाºयांच्या नेतृत्वात २० वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चमू गुरुवारी अचानक शहरातील रस्त्यांवर दखल झाल्या आणि मास्क न लावणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई सुरू केली. चार तासांत १६८ नागरिकांकडून ५३ हजार ३०० वसूल करण्यात आले.
कठोरपणे आकस्मिक कारवाई होत असल्याचे बघून बेपर्वाईने शहरात फिरणाऱ्या लोकांची तारांबळ उडाली. कोरोना नियंत्रणासाठी बंधने पाळणार नसाल, तर मुलाहिजा केला जाणार नाही, असा संदेश या कारवाईतून जिल्हा प्रशासनाने दिला.
दक्षता ही सद्यस्थितीत प्रत्येकाची जबाबदारी आहे. कारवाईची वेळच येऊ देऊ नका, असे आवाहन प्रशासनाद्वारे वारंवार केले जात आहे. तरीही अनेक बेजबाबदार नागरिक मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी फिरत असल्याचे आढळून येत आहे. कोरोना साथीच्या नियंत्रणासाठी अशा बेशिस्त नागरिकांना शिस्त लावण्यासाठीच कारवाईची विशेष मोहीम प्रशासनाने हाती घेतली आहे. याअंतर्गत जिल्हाधिकाºयांसह त्यांच्या पथकाने सकाळी इर्विन चौकात थांबून कारवाई केली. तहसीलदार संतोष काकडे, महापालिकेचे उपायुक्त नरेंद्र वानखडे, पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
घरोघरी तपासणी व लोकशिक्षणासाठी ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. कोरोनाला दूर ठेवण्यासाठी स्वच्छता, मास्क, सोशल डिस्टन्सिंग या त्रिसूत्रीचा अवलंब झालाच पाहिजे. मात्र, वारंवार सांगूनही कुणी जर बेपर्वाईने वागत इतरांचे आरोग्य धोक्यात आणत असेल, तर कारवाई करावीच लागेल. त्यामुळे आता सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क न वापरणाºयांवर कारवाई करण्यात येत आहे. महापालिका, जिल्हा परिषद, पोलीस, आरोग्य भूजल आदी विभागांच्या समन्वयातून जिल्हाभरात अशी मोहीम राबवली जात असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.
अधिकाºयांच्या साहाय्याला महापालिकेचे स्वास्थ्य निरीक्षक, पोलीस कॉन्स्टेबल आहेत. पथकांना कारवाईत अडचण आल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर, सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे व पोलीस निरीक्षक पुंडकर यांच्याशी संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे. उशीर माहितीनुसार सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यासाठी एका व्यक्तीला, फिजिकल डिस्टन्ससाठी पाच आस्थापनांना दंडीत करण्यात आले.

प्रत्येकी पाच पथकांचे नियंत्रण उपजिल्हाधिकाऱ्यांकडे
महापालिका क्षेत्रात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची २० पथके तयार करण्यात आली. एका उपाजिल्हाधिकाºयाकडे पाच पथकांचे नियंत्रण सोपविण्यात आले आहे. विशेष म्हणजे, जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईसाठी या सर्व अधिकाºयांना प्राधिकृत केले. यापूर्वी भादंवि १८६० चे कलम १८८ अन्वये कारवाईचे अधिकार संबंधित पोलीस ठाण्याच्या पीएसआय वा त्यापेक्षा उच्च दर्जाच्या अधिकाऱ्यांना कारवाईचे अधिकारी बहाल करण्यात आले होते. आता २६ सप्टेंबरपर्यंत या सर्व अधिकाºयांनाही बहाल करण्यात आले आहे.

Web Title: 20 officers fined on the spot for not wearing action mask

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.