शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बँकेची १४ लाखांनी फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2016 23:59 IST

बनावट खरेदीपत्राने येथील आंध्रा बँकेची सुमारे १४ लाखांनी फसवणूक करण्यात आली.

अमरावती : बनावट खरेदीपत्राने येथील आंध्रा बँकेची सुमारे १४ लाखांनी फसवणूक करण्यात आली. ९ डिसेंबर २०१४ रोजी हा प्रकार घडल्याचे तक्रार बँकेमार्फत शुक्रवारी शहर कोतवाली ठाण्यात करण्यात आली आहे. विशाल अशोक मोहोड (रा.पटवीपुरा), संजय केदारनाथ सराफ (मुधोळकर पेठ) आणि गजानन वसंत कुळकर्णी (रा. पटवीपुरा) या तिघांचा आरोपींमध्ये समावेश आहे. त्यांचेविरुध्द पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ४२०, ४६७,४६८ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणातील गजानन कुळकर्णी हा मुख्य आरोपी असून त्याने यापूर्वीही बँकेत बनावट दस्तऐवज ठेवून बँकेची कोट्यवधींची फसवणूक केली आहे. आरोपी कर्जदार विशाल मोहोड याने बनावट खरेदीपत्र व शपथपत्र तयार केले, तर संजय सराफ व गजानन कुळकर्णी यांनी ते खरेदीपत्र बँकेजवळ जमानतीवर गहाण ठेवले आहे.खरेदीसाठी घेतले कर्जअमरावती : प्लॉट खरेदीकरिता १४ लाखांचे कर्ज घेतले. मात्र, त्यानंतर चुकीच्या पद्धतीने त्या रकमेचा गैरवापर केला. याबाबत आंध्रा बँकेचे शाखा व्यवस्थापक पी.फणी लक्ष्मीकांत यांच्या तक्रारीवरून शहर कोतवाली पोलिसांनी गुन्हे नोंदविले आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. यापूर्वीही याच प्रकरणातील आरोपीविरुद्ध तब्बल पाच कोटी रुपयांनी बँकेची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. बनावट खरेदीखत करून या तोतयांनी अनेक बँकांना गंडा घातल्याचा संशय व्यक्त होत आहे. ( प्रतिनिधी)