अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणारा युवक गजाआड

By Admin | Updated: May 25, 2014 01:04 IST2014-05-25T01:00:31+5:302014-05-25T01:04:39+5:30

लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण करणार्‍या युवक गजाआड; २७ मे पर्यंत पोलिस कोठडी

Youth Gazad, a sexual exploitation of a minor girl | अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणारा युवक गजाआड

अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणारा युवक गजाआड

अकोला : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण करणार्‍या युवकास खदान पोलिसांनी शुक्रवारी दुपारी गजाआड केले. या प्रकरणी पोलिसांनी युवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला, शनिवारी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याला २७ मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. मलकापूर परिसरात राहणारा कैलास हिरामण सावळे (३२) या विवाहित युवकाने परिसरातीलच एका १५ वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून गुजरातमध्ये पळवून नेले. कैलास सावळे याने आपल्या मुलीला पळवून नेल्याची तक्रार अडीच महिन्यांपूर्वी तिच्या कुटुंबीयांनी खदान पोलिस ठाण्यात दाखल केली होती. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३६३, ३६६ नुसार गुन्हा दाखल केला होता. गुजरातला पळवून नेले. दरम्यान, आरोपीने अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तब्बल दोन-अडीच महिने अल्पवयीन मुलीचे शोषण केल्यानंतर तो मुलीला घेऊन अकोल्यात परत आला. ही माहिती खदान पोलिसांना मिळताच त्यांनी त्याच्यावर लक्ष ठेवले आणि शुक्रवारी दुपारी त्याला गजाआड केले. आरोपी कैलास सावळे हा विवाहित असून, त्याला दोन लहान मुले आहेत.

Web Title: Youth Gazad, a sexual exploitation of a minor girl