शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

यावर्षीही शेतीमध्ये ‘पीपीपी’ पॅटर्न

By admin | Updated: May 22, 2015 01:51 IST

कापूसाचे उत्पादन वाढविण्यासाठी कृषी विभाग यंदा उत्पादन वाढ प्रकल्प राबविणार.

अकोला : राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत राज्यात शासकीय व खासगी भागीदारीने (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) उत्पादन वाढ प्रकल्प राबविण्यात आला आहे. यंदाही हा प्रकल्प राज्यासह विदर्भात राबविण्यात येणार असल्याचे वृत्त असून, यामध्ये विविध आठ पिकांसह कापूस या महत्त्वपूर्ण पिकाचा समावेश करण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाड्यात कापसाचे क्षेत्र अधिक असून, उत्तर महाराष्ट्रात जळगाव खान्देश या भागात कापसाचे पीक घेतले जात आहे. या पिकाचे उत्पादन वाढविण्यासाठी राज्याचे कृषी विभागाचे मुख्य सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल यांनी वर्‍हाडातील अकोला, अमरावती व बुलडाणा जिल्हय़ात हा प्रकल्प राबविला आहे. या प्रकल्पामुळे अमरावती जिल्हय़ातील दर्यापूर तालुक्यातील शेतकर्‍यांचा एका खासगी कापूस बियाणे कंपनीसोबत करार करण्यात आला होता. या माध्यमातून शेतकर्‍यांना चांगले उत्पादन मिळाले आहे. यंदा सुद्धा हा प्रकल्प राबविण्यात येणार असून, खासगी नामांकित बियाणे कंपन्यांसोबत शासनाने हा करार केला आहे. या खासगी बियाणे कंपन्या शेतकर्‍यांना उत्कृष्ट निविष्ठा,तंत्रज्ञान व बियाणे पेरणी व शेती उत्पादनासाठी लागणारे महत्त्वाचे प्रशिक्षण देणार आहेत. खते, कीटकनाशके कधी व किती प्रमाणात वापरावी, यासाठीचे सर्व प्रशिक्षण हे या खासगी कंपन्यांचे शास्त्रज्ञ शेतकर्‍यांना प्रत्यक्ष शेतावर देणार आहेत. याकरिता कृषी मंत्रालयाने निधीची तजवीज केली आहे. खासगी कंपन्यांसोबत याबाबतचा करार केला आहे. दरम्यान, मागील खरीप हंगामात पश्‍चिम विदर्भातील बुलडाणा जिल्हय़ातील कापूस या पिकासाठी एका खासगी कंपनीशी करार केला होता. या करारानुसार १६४0 हेक्टर क्षेत्रावर त्या कंपनीचे कापूस बियाणे लागवड करण्यात आली होती. या प्रकल्पावर ७३ लाख रुपये खर्च करण्यात आले, तसेच या विभागात सोयाबीन व मका या पिकांसाठी हा प्रकल्प राबविण्यात आला आहे. शासकीय, खासगी व शेतकरी असा हा उत्पादन वाढ प्रकल्प असूून, या प्रकल्पांतर्गत खासगी कंपनी, शेतकरी व शासनाचा निधी असतो. या प्रकल्पांतर्गत नामांकित खासगी व शासकीय बियाणे कंपन्या शेतकर्‍यांना निविष्ठा, खते, कीटकनाशकांचा वापर व इतर पेरणीसंदर्भातील माहिती प्रत्यक्ष देतात. यंदा हा प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे कृषी सहसंचालक एस.आर. सरदार यांनी सांगीतले.