शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळ्याच्या प्रारंभीच पाणीटंचाईची स्थिती

By admin | Updated: November 12, 2014 00:05 IST

राज्यातील दीडशे गावांना टँकरने पाणीपुरवठा.

बुलडाणा: राज्यात यावर्षी झालेल्या कमी पावसाच्या पार्श्‍वभूमीवर, हिवाळा प्रारंभ होतानाच, राज्याच्या अनेक भागांमध्ये पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. उन्हाळा अद्याप लांब असताना राज्यात तब्बल १७७ गावे-वाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पाणी पुरवठा विभाग आणि जलसंधारणाच्या डझनावरी योजनांवर कोट्यावधी रुपयांचा खर्च करूनही, राज्यातील काही भागांमध्ये पिण्याचे पाणी पोहचवण्याची कायमस्वरूपी व्यवस्था अजूनही निर्माण होऊ शकलेली नाही. राज्यातील एकूण ३८ गावे आणि १३९ वाड्यांना सध्या टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. त्यासाठी एकूण ६७ टँकर कामाला लावण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ९४, सोलापूर जिल्ह्यात २६, जालना जिल्ह्यात १८, अहमदनगर जिल्ह्यात १६, बुलढाणा जिल्ह्यात चार, तर लातूर जिल्ह्यातील एका गावाचा टँकरने पाणी पुरवठा सुरू असलेल्या गावांमध्ये समावेश असल्याची माहिती, पाणी पुरवठा विभागाकडून प्राप्त झाली आहे. यापैकी बहुतांश गावांना कायमस्वरूपी टँकरने पाणी पुरवठा केल्या जात आहे. गतवर्षी याच कालावधीत २२ गावे आणि १४३ वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्याची पाळी आली होती.