शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

विजय तेलंग स्मृती आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेत अकोल्याचा ९ गडी राखून विजय

By admin | Updated: November 29, 2014 21:51 IST

निखिल भोसलेचे शानदार शतक; सचिन थोरातचे अर्धशतक.

अकोला: बुलडाणा संघाचा भरवशाचा सलामीचा फलंदाज निखिल भोसले याच्या शानदार शतकी खेळीने बुलडाणा संघाला बलाढय़ भंडारा संघावर ६ गडी राखून विजय मिळविता आला. भंडारा विरुद्ध बुलडाणा जिल्हा संघातील हा सामना अकोला क्रिकेट क्लब मैदानावर शनिवारी खेळण्यात आला.भंडारा संघाने प्रथम फलंदाजी करीत ५0 षटकात ९ बाद १७४ धावसंख्या उभारली. गणेश जोशीच्या ३९ धावांव्यतिरिक्त अन्य फलंदाज खेळपट्टीवर फारशी कामगिरी दाखवू शकले नाहीत. बुलडाणा संघाकडून रामेश्‍वर सोनोने याने २ गडी बाद केले. सतीश परिहार, संतोष आठवले, ऋषिकेश पवार, निखिल कुळकर्णी यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.प्रत्युत्तरात बुलडाणा संघाने ३७.५ षटकात ४ बाद १७७ धावा काढून सहज विजय मिळविला. सर्वप्रथम फलंदाजीला उतरलेल्या सुशील वानखडे याने केवळ ९ धावा काढल्या. त्याचा जोडीदार निखिल भोसले याने चौकार व षटकारांची आतषबाजी करून नाबाद १0६ धावा काढून, स्पर्धेतील पहिले शानदार शतक झळकाविले. प्रमोद वाघ केवळ ३ धावा काढून माघारी परतला. शुभम पाटीलने १७ धावांचे योगदान दिले. गोपाल निळे याने १ धाव दिली. सामन्यात पंच म्हणून संजय हिंगोलीकर, श्रीकांत बोपळे यांनी काम पाहिले. गुणलेखन नीलेश धापुडकर यांनी केले.दुसरा सामना अरुण दिवेकर क्रीडांगण येथे गडचिरोली व अकोला जिल्हा संघात झाला. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या गडचिरोली संघाने ३६ षटकात सर्वबाद ८८ धावा काढल्या. अकोला संघाकडून प्रणव आठवले व अंकुश वाकोडे यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. शारिक खान, मयूर बडे, नयन चव्हाण यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. गडचिरोली संघाने दिलेले आव्हान अकोला संघाने अवघ्या ११ षटकात १ गडी गमवित ९२ धावा काढून सहज विजय मिळविला. सचिन थोरात याने नाबाद ५१ धावा काढल्या. प्रणव आठवले याने ३१ धावांचे योगदान दिले. प्रणव परनाटे याने नाबाद १ धाव दिली. गडचिरोलीच्या राजीक खतीब याने प्रणव आठवले याला त्रिफळाचित केले. सामन्यात पंच म्हणून प्रकाश सिंह, कपिल गिरी यांनी काम पाहिले. नीलेश लखाडे याने गुणलेखन केले.