वाहने तपासणी मोहीम जोरात!

By Admin | Updated: February 18, 2017 02:35 IST2017-02-18T02:29:11+5:302017-02-18T02:35:04+5:30

महापालिका निवडणुकीच्या पृष्ठमीवर पोलिसांनी वाहने तपासणी मोहीम सुरू केली आहे.

Vehicle Inspection Campaign Enhanced! | वाहने तपासणी मोहीम जोरात!

वाहने तपासणी मोहीम जोरात!

अकोला, दि. १७- महापालिका निवडणुकीच्या पृष्ठमीवर पोलिसांनी वाहने तपासणी मोहीम सुरू केली आहे. महापालिका क्षेत्रात समाविष्ट झालेल्या गावातील रस्त्यावरही वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.
वाहनांमध्ये मद्याच्या बॉटल्स, रोकड, शस्त्र वाहून नेली जाऊ नये याकरिता पोलीस प्रशासन ही खबरदारी घेत असल्याचे समजते. गुडधी येथेही पोलिसांची तात्पुरती चौकी निर्माण करण्यात आली असून, येथे चोवीस तास पोलिसांचा पहारा लावण्यात आला आहे.
गुडधीवरू न अमरावती, दर्यापूर, मूर्तिजापूर आदी ठिकाणी जाण्यासाठी रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यावर प्रत्येक वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. त्या वाहनांचे क्रमांकही टिपले जात आहेत. जठारपेठ चौकातही पोलीस वाहनांची तपासणी करण्यात येत असून, शहरात प्रवेश करणार्‍या प्रत्येक रस्ता व वाहनांची नोंद घेतली जात आहे.

Web Title: Vehicle Inspection Campaign Enhanced!