शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
2
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
3
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
4
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
5
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
6
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
7
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
8
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
9
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
10
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
11
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
12
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
13
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
14
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
15
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
16
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
17
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
18
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
19
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
20
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
Daily Top 2Weekly Top 5

शहर विकासाच्या मुद्द्यांवर उद्धवसेनेने दिला थेट भाजपाला प्रस्ताव; भाजपा-उद्धवसेना युती होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 11:49 IST

आमचा प्रस्ताव मान्य असेल तर भाजपाने आमच्याशी चर्चा करावी, उद्धवसेनेच्या आमदाराची माहिती

अकोला - शहर विकासाच्या मुद्द्यांवर काही नगरसेवकांनी आमच्याशी संपर्क साधल्याचा दावा भारतीय जनता पक्षाकडून केला जात असला तरी तो पूर्णपणे दिशाभूल करणारा आहे. भाजपाने खरेच शहराचा विकास केला असता तर त्यांच्या नगरसेवकांची संख्या ४८ वरून ३८ वर आली नसती अशी टीका उद्धवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी करत सत्ता समीकरणात भाजपाला प्रस्ताव दिल्याचं सांगितले आहे. शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी नितीन देशमुख म्हणाले की, भाजपाचे माजी महापौर विजय अग्रवाल यांनी आमच्याशी संपर्क साधला. त्यांना आम्ही शहर विकासाचा प्रस्ताव दिला आहे. तो मान्य असेल तर आम्ही भाजपाच्या सोबत जाऊ, अन्यथा काँग्रेससोबत जाऊ असे आमदार देशमुख यांनी सांगितले. अकोला महापालिकेत पक्षाचे सर्व सहा नगरसेवक उद्धवसेनेसोबतच आहेत असं त्यांनी स्पष्ट केले. त्याशिवाय भाजपा नेत्यांकडून चुकीच्या पद्धतीने प्रसार करून उद्धवसेनेचे नगरसेवक संपर्कात असल्याचं वक्तव्य केले जात आहे. माजी महापौर विजय अग्रवाल यांचा फोन आला होता. त्यांना जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्याशी चर्चा करण्यास सांगितली. या चर्चेत आम्ही शहराच्या विकासाचे मुद्दे मांडले. आम्हाला पदांची अपेक्षा नसून शहराच्या खऱ्या अर्थाने विकास व्हावा हीच आमची भूमिका आहे असं त्यांनी म्हटलं.

या मुद्द्यांच्या आधारे दिला प्रस्ताव

शहरात बससेवा सुरू करावी, हद्दवाढीसाठी १५० कोटी रुपयांचा प्रलंबित निधी द्यावा, आतापर्यंत आलेले १०० कोटी रुपये नेमके कुठे खर्च झाले याची चौकशी व्हावी, मालमत्ता कर कमी करावा, हद्दवाढ भागात नियमित पाणीपुरवठा करावा, जिगाव प्रकल्पाचे पाणी पिण्यायोग्य नसल्याने शहराला वान धरणातून एक दिवसाआड शुद्ध पाणीपुरवठा करावा, झोननिहाय हॉस्पिटल असावीत, रस्त्यांचे थर्ड पार्टी इन्स्पेक्शन करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे अशी ठाम भूमिका उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख दातकर यांनी माजी महापौर विजय अग्रवाल यांच्याशी चर्चा करताना मांडल्याची माहितीही आमदार देशमुखांनी दिली.

दरम्यान, उद्धवसेनेने दिलेल्या प्रस्तावावर अद्याप भाजपाकडून कुठलेही स्पष्टीकरण आले नाही. याउलट उद्धवसेनेचे नगरसेवक संपर्कात असल्याचे चुकीचे वक्तव्य करून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप आमदार नितीन देशमुखांनी केला. मात्र आमचा प्रस्ताव मान्य असेल तर भाजपाने आमच्याशी चर्चा करावी अन्यथा आम्ही विरोधी बाकांवर बसून जनतेसाठी संघर्ष करू. चर्चा न करताच कुठलीही बाबी माध्यमांपुढे मांडू नये असा सल्लाही उद्धवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी भाजपा नेत्यांना दिला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Uddhav Sena Offers BJP Proposal on City Development; Alliance Possible?

Web Summary : Uddhav Sena proposed city development terms to BJP in Akola, including bus service, funds, and water supply. They deny BJP's claim of contact from corporators, ready to align if terms are met, otherwise, they will remain in opposition.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Akola Municipal Corporation Electionअकोला महानगरपालिका निवडणूक २०२६Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाcongressकाँग्रेस