शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

कट्यार येथील दोन शेतक-यांचा आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Updated: December 10, 2014 01:58 IST

एकाची प्रकृती गंभीर, दुस-याची धोक्याबाहेर.

अकोला - कर्जबाजारीपणा आणि यावर्षीच्या दुष्काळामुळे झालेल्या नापिकीला कंटाळून अकोला तालुक्यातील कट्यार येथील एका युवा शेतकर्‍याने रविवारी, तर दुसर्‍या शेतकर्‍याने मंगळवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या दोन्ही शेतकर्‍यांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सवरेपचार रुग्णालयात उपचार सुरू असून, एकाची प्रकृती स्थिर असून, दुसरा शेतकरी मात्र मृत्यूशी झुंज देत आहे. या प्रकाराने कट्यार परिसर हादरा आहे.कट्यार येथील रहिवासी गणेश शालीग्राम दंदी (४८) यांच्याकडे तीन एकर शेती असून, त्यांनी अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून ३0 हजार रुपयांचे कर्ज घेऊन शेतात पेरणी केली. सोयाबीन आणि मूग पेरल्यानंतर थोड्या प्रमाणात पाऊस आला. चांगले पीक होण्याची अपेक्षा होती, मात्र पावसाने हुलकावणी दिल्याने मूग होता त्याच अवस्थेत करपला. दीड एकरामध्ये ७0 ते ८0 किलो सोयबीन झाले आणि हरभरा पेरला तरी उगवण्याची शाश्‍वती नव्हती. त्यामुळे बँकेचे आणि एका खासगी व्यक्तीकडून घेतलेले कर्ज फेडणे तसेच संसाराचा गाडा पुढील एका वर्षे चालविणे अशक्य वाटल्याने गणेश दंदी यांनी राहत्या घरात मंगळवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार त्यांची पत्नी शोभा यांच्या निदर्शनास येताच त्यांनी आरडा-ओरड केली. महिलेचा आवाज ऐकताच घराच्या आजूबाजूची मंडळी मदतीसाठी धावल्याने गणेश दंदी यांचे प्राण वाचले; मात्र त्यांची प्रकृती अद्यापही गंभीर असून, त्यांच्यावर सवरेपचार रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याच गावातील युवा शेतकरी दीपक राजू साबे याचे एप्रिल महिन्यात लग्न झाले. लग्नासाठी काही प्रमाणात कर्ज घेतले, तर त्यानंतर पेरणीसाठी कर्ज घेतले. येणार्‍या हंगामात संपूर्ण कर्ज फेडण्याच्या जिद्दीने या शेतकर्‍याने शेतात काम सुरू केले; मात्र पावसाने दडी मारल्याने दुष्काळ पडला आणि जिद्दीने कामाला लागलेल्या या शेतकर्‍याच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली.