नया अंदुरा परिसरात तुरीचे उत्पादन घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:14 IST2021-02-05T06:14:33+5:302021-02-05T06:14:33+5:30

नया अंदुरा, कारंजा रमजानपूर व अंदुरा परिसरातील शेतशिवारात एकरी एक क्विंटल तुरीचे उत्पादन झाले आहे. त्यामुळे लागलेला खर्च वसूल ...

Turi production declined in the new Andura area | नया अंदुरा परिसरात तुरीचे उत्पादन घटले

नया अंदुरा परिसरात तुरीचे उत्पादन घटले

नया अंदुरा, कारंजा रमजानपूर व अंदुरा परिसरातील शेतशिवारात एकरी एक क्विंटल तुरीचे उत्पादन झाले आहे. त्यामुळे लागलेला खर्च वसूल झाला नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. गत अनेक दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण राहत असल्याने अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेंगा भरल्याच नाहीत. शेंगा परिपक्व असल्याचे दिसत नसून शेंगांना कीड व अळीचा प्रादुर्भाव होता. त्यामुळे तूर पिकाला पेरणीपासून लावलेला खर्च वसूल झाला नसून तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर उतारा कमी झाल्याचे अनेक शेतकरी सांगत आहेत. नया अंदुरा, अंदुरा, हाता, निंबा, बहादुरा, शिंगोली, निंबी परिसरात मोठ्या प्रमाणावर तूर पिकाची पेरणी करण्यात आली होती. सतत ढगाळ वातावरणामुळे तूर पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने अळीचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी फवारणी खर्चही केला आहे. तरीसुद्धा अळीने शेंगा पोखरल्यामुळे पिकाचे उत्पादन कमी झाले. तूर पेरणीसाठी बियाणे, खते, पेरणी, खुरपणी, महागडे औषधांची फवारणी, कापणीसह एकरी आठ ते साडेआठ हजारांपर्यंत खर्च झाला आहे. तथापि तूर पिकांसाठी एकरी तीन ते साडेतीन हजार रुपये सोंगणीसाठी मजुरी द्यावी लागली. एकरी एक क्विंटल उत्पादन निघत असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे. उत्पादित खर्च व उत्पादित तुरीचा हिशेब करता, खरीप हंगाम मोठ्या नुकसानीचा ठरला आहे.

फोटो:

Web Title: Turi production declined in the new Andura area