शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून आणखी एकाचा खून, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
3
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
4
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
5
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
6
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
7
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
8
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
9
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
10
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
11
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
12
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
13
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
14
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
15
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
16
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
17
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
18
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
19
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
20
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव लक्झरी बसची दुचाकीला धडक; मायलेकांसह तीन जागीच ठार, जमावाने बस पेटविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 15:17 IST

बार्शीटाकळी (अकोला) : भरधाव जात असलेल्या लक्झरी बसने विरुद्ध दिशेने येत असलेल्या दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील मायलेकांसह तीन जण ठार झाल्याची घटना अकोला ते मंगरुळपीर मार्गावरील दगडपारवा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय)जवळ बुधवारी दुपारी दीड वाजताचे सुमारास घडली.

बार्शीटाकळी (अकोला) : भरधाव जात असलेल्या लक्झरी बसने विरुद्ध दिशेने येत असलेल्या दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील मायलेकांसह तीन जण ठार झाल्याची घटना अकोला ते मंगरुळपीर मार्गावरील दगडपारवा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय)जवळ बुधवारी दुपारी दीड वाजताचे सुमारास घडली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी लक्झरी बसची तोडफोड करून पेटवून दिली.
खासगी प्रवासी वाहतुक करणारी बस (एम.एच. ३७ बी. ६९४९) अकोला येथून मंगरुळपीरकडे जात होती.त्याचवेळी दगडपारवा येथून एम.एच. ३० - एडब्ल्यू ७८५१ क्रमांकाच्या दुचाकीवर दगडपारवा येथील तीघे जण   बार्शीटाकळीच्या दिशेने जात होते. या खासगी बसने बार्शीटाकळी व दगडपारवा गावाच्या दरम्यान असलेल्या आयटीआय जवळ विरुद्ध दिशेने येत असलेल्या दुचाकीला धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की, यामध्ये दुचाकीवरील अनुराधा प्रकाश राठोड, नितीन प्रकाश राठोड (दोघेही रा. दगडपारवा) व अस्मिता पवार (१४, रा. दहातोंडा, ता. मूर्तीजापूर) यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच दगडपारवा येथील ग्रामस्थांनी घटनास्थळावर धाव घेतली. यावेळी संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी खासगी बसची तोडफोड केली. ग्रामस्थ एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी बस पेटवून दिली. घटनेची माहिती समजताच बार्शीटाकळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावास शांत करण्याचा प्रयत्न केला. जमावाचे उग्र पाहता पोलिसांनी अकोल्याहून अतिरिक्त कुमक बोलावली.

 

टॅग्स :AkolaअकोलाBarshitakliबार्शिटाकळीAccidentअपघात