तीन जिल्ह्यात चोरी करणारे चोरटे गजाआड

By सचिन राऊत | Updated: July 4, 2024 22:09 IST2024-07-04T22:08:56+5:302024-07-04T22:09:08+5:30

जिल्हयातील मुर्तीजापुर मधील दोन हनुमान मंदीर येथे केलेल्या चोर्‍यांची सुद्धा कबुली दिली आहे.

Thieves stealing in three districts arrested | तीन जिल्ह्यात चोरी करणारे चोरटे गजाआड

तीन जिल्ह्यात चोरी करणारे चोरटे गजाआड

अकोला: अमरावती, वाशिम व अकोला जिल्ह्यात चोरीचे करणार्‍या चोरट्यांना अमरावती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून दोन दुचाकीसह लाखो रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या निर्देशावरून गुन्हे शाखेचे पथक शोध कामी रवाना झाले होते.

संशयित आरोपी सुरज ठाकुर रा. अकोला हा त्याचा साथीदार सुलतान शेख याचेसह एका दुचाकीवर पोलिस स्टेशन मुर्तीजापुर हद्दीत फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. पथकाने मुर्तीजापुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोस्ट ऑफीसजवळ दोन संशयीतांना दुचाकीसह ताब्यात घेतले. यातील सुरज नवलसिंग ठाकुर (२१) रा. अण्णाभाउ साठे नगर, शिवाजी पार्क अकोला ह. मु. मालोकर हाउस, शिवाजी नगर, मुर्तीजापुर जिल्हा अकोला, सुलतान शेख रशीद शेख (२१) रा. नई वरसात रलीयाती दाहोद, ता.जि. दाहोद, राज्य गुजरात हे दोन आरोपी अटक करण्यात आले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने विचारपुस केली असता धामणगाव रेल्वे शहरातून दोन दुचाकी चोरी करून जैन मंदीर येथील दानपेटी फोडुन चोरी केल्याचे व हिरो ईग्नोटोर घेऊन पसार झाल्याची कबुली दिली आहे. जिल्हयातील मुर्तीजापुर मधील दोन हनुमान मंदीर येथे केलेल्या चोर्‍यांची सुद्धा कबुली दिली आहे.

Web Title: Thieves stealing in three districts arrested