दवाखान्यात चोरी

By Admin | Updated: May 10, 2014 22:23 IST2014-05-10T21:54:43+5:302014-05-10T22:23:08+5:30

दवाखान्याचे कुलूप तोडून माल लंपास

Theft in the hospital | दवाखान्यात चोरी

दवाखान्यात चोरी

मंगरुळपीर: येथील मेनरोडवरील नगर पालीका शॉपींग सेंटरमध्ये असलेल्या डॉ.गट्टाणी यांच्या दवाखान्याचे कुलूप तोडून अज्ञात चोरटयांनी सोळा हजार पाचशे रुपयाचा माल लंपास केल्याची घटना ९ मे च्या रात्री घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी डॉ.मनोज गट्टाणी यांनी दि.१0 रोजी पोलिसात तक्रार दिली की, ९ मे च्या रात्री, अज्ञात चोरटयांनी त्यांच्या दवाखान्याचे कुलुप तोडून आत प्रवेश केला व गल्ल्यातील रोख १२ हजार रुपये, १ मोबाईल हँन्डसेट व १ ग्रॅम सोन्याचा शिक्का असा एकूण १६ हजार पाचशे रुपयाचा मुद्दे माल लंपास केला या फिर्यादी वरुन पोलिसांनी अज्ञात चोरटयाविरुद्ध कलम ४५७, ३८0 भादवी अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ए.एस.आय साखरकर करीत आहेत .मुख्य रस्त्यावरील या चोरीच्या घटनेने व्यावसायीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी व्यवसायीक करीत आहेत.

Web Title: Theft in the hospital