मराठा महासंघाची तालुका शाखा कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:16 IST2021-01-18T04:16:36+5:302021-01-18T04:16:36+5:30

तेल्हारा : अखिल भारतीय मराठा महासंघ अकोला जिल्हांतर्गत तेल्हारा तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये तालुका अध्यक्षपदी अंकुश ...

Taluka branch executive of Maratha Federation announced | मराठा महासंघाची तालुका शाखा कार्यकारिणी जाहीर

मराठा महासंघाची तालुका शाखा कार्यकारिणी जाहीर

तेल्हारा : अखिल भारतीय मराठा महासंघ अकोला जिल्हांतर्गत तेल्हारा तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये तालुका अध्यक्षपदी अंकुश सपकाळ यांची निवड करण्यात आली. मराठा महासंघाचे विभागीय पदाधिकारी, राष्ट्रीय उपाध्यक्ष विनायकराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे, जिल्हा उपाध्यक्ष सचिन शिंदे यांनी केलेल्या शिफारसीनुसार नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली.

महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. शशिकांत पवार व सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांनी ही समिती नियुक्त केली असून, या समितीत अध्यक्षपदी अंकुश सपकाळ, उपाध्यक्षपदी किशोर ताथोड, संदीप जवंजाळ, नितीन देशमुख, प्रदीप उर्फ मुन्ना खारोडे, वैभव गावंडे, अमोल राऊत, संपर्क प्रमुखपदी प्रवीण राऊत, ऋषिकेश गावंडे, श्रीकांत कोरडे तर प्रसिद्धी प्रमुखपदी व सोशल मीडिया प्रमुखपदी अभिजीत गावंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title: Taluka branch executive of Maratha Federation announced