शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

अन् ७० वर्षांच्या अन्नपूर्णाबाईंच्या मदतीला धावली यंत्रणा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:22 IST

मूर्तिजापूर : तालुक्यातील फणी गावात एकटीच म्हातारी राहत असून ‘फणी गावावर ७० वर्षांच्या वृद्धेचे अधिराज्य’ असे वृत्त शुक्रवारी ‘लोकमत’ने ...

मूर्तिजापूर : तालुक्यातील फणी गावात एकटीच म्हातारी राहत असून ‘फणी गावावर ७० वर्षांच्या वृद्धेचे अधिराज्य’ असे वृत्त शुक्रवारी ‘लोकमत’ने प्रकाशित करताच, प्रशासन तातडीने फणी गावात दाखल झाले. अन्नपूर्णाबाईंना भेटून तहसीलदारांनी तात्पुरती मदत केली. तेव्हा ७० वर्षांच्या अन्नपूर्णाबाईंनी गहिवरून आपली कहाणी सांगितली.

काही वर्षांपूर्वी फणी गावाची दोनशेच्यावर लोकवस्ती होती. कालांतराने हळूहळू लोकांनी आपले गाव सोडले. २०११ च्या जनगणनेनुसार त्या गावात ३५ लोक राहत असल्याची नोंद आहे. परंतु प्रत्यक्षात फणी गावात एकटीच म्हातारी राहत आहे. काही दिवसांपूर्वी तिचे घर पावसाने क्षतिग्रस्त झाले असून बाजूच्या किणी गावात गुरांच्या गोठ्यात तिने तात्पुरता आश्रय घेतला आहे. धानोरा वैद्य, किणी, फणी ही तीन गावे मिळून धानोरा गट ग्रामपंचायत आहे. विशेष म्हणजे सरपंच फणी या गावच्या असून त्याही मूर्तिजापूर येथे राहतात. परंतु या गावात मोजकी घरे उभी असली तरी ती घरे अडगळीत पडलेली आहेत.

फोटो:

तीन महिन्यांचा अन्नधान्याचा साठा व आर्थिक मदतही!

तहसीलदार प्रदीप पवार यांनी या गावात भेट दिली असता, घराच्या आजूबाजूला असलेले गवत काढून आम्ही येथेच राहत असल्याचा आव सरपंचांनी आणला.

तहसीलदार प्रदीप पवार यांनी सहानुभूतीपूर्वक आस्थेने आजीबाईची विचारपूस करून तिला तिला धीर देत, दोन-तीन महिने पुरेल एवढे अन्नधान्य व इतर साहित्य देऊन आरोग्याची काळजी घेण्यासाठी आर्थिक मदतही केली.

लोकमतने प्रकाशित केलेल्या बातमीमुळे हा प्रकार उघडकीस आला. वृत्त वाचून आम्ही त्या गावात पोहोचलो. तेव्हा त्या गावात सध्या कोणीच राहत नाही, वृद्ध अन्नपूर्णाबाईसाठी श्रावणबाळ योजनेत तरतूद, अन्नपुरवठा योजनेअंतर्गत धान्य व घरकुलासाठी प्रयत्न करून तिची आर्थिक व राहण्याची समस्या लवकरच मार्गी लावू

-प्रदीप पवार, तहसीलदार, मूर्तिजापूर