शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
3
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
4
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
5
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
6
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
7
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
8
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
9
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
10
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
11
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
12
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
13
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
14
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
15
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
16
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
17
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
18
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
19
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
20
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सराफ बाजारातील खाणावळीसमोर सोने खरेदीचा व्यवहार झाल्याचा पोलिसांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 11:13 IST

चोरीतील सोने खरेदी-विक्रीचा व्यवहार सराफ बाजारात असलेल्या खाणावळीसमोर होत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे, असे जाधव यांनी सांगितले.

ठळक मुद्देचोरीचे सोने खरेदी करण्याचा हा व्यवहार २८ नोव्हेंबर रोजी झाला.नेमके त्याच दिवशी राजू वर्मा यांच्या दुकानातील सीसी कॅमेरे बंद होते.

- सचिन राऊतलोकमत न्यूज नेटवर्कअकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या चोरीतील सोने खरेदी-विक्रीचा व्यवहार हा राजकुमार वर्मा यांच्या दुकानात नव्हे, तर सराफ बाजारातील बटुकलाल यांच्या खानावळीसमोर झाल्याचे तपासात समोर असल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली. ज्या दिवशी सोने खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला नेमके त्याच दिवशी वर्मा यांच्या दुकानातील सीसी कॅमेरे बंद असल्यामुळे नेमके तपासावे तरी काय, असा सवालही पोलिसांनी उपस्थित केला.खदान पोलिसांनी अटक केलेल्या दोन चोरट्यांच्या चौकशीत, त्यांनी चोरीतील सोने सराफ असोसिएशनचे महानगराध्यक्ष राजू वर्मा यांना विकल्याचे समोर आल्यानंतरच पोलिसांनी वर्मा यांच्याकडून ९० ग्रॅम सोने जप्त केल्याची माहिती, खदानचे ठाणेदार उत्तमराव जाधव यांनी दिली. चोरीच्या सोन्याची खरेदी-विक्री करताना सराफ त्यांच्या दुकानात व्यवहार करीत नाहीत. अशा प्रकारचे व्यवहार सराफ बाजारात असलेल्या खाणावळीसमोर होत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे, असे जाधव यांनी सांगितले.

नेमके त्याच दिवशी सीसी कॅमेरे बंद का?चोरीचे सोने खरेदी करण्याचा हा व्यवहार २८ नोव्हेंबर रोजी झाला. नेमके त्याच दिवशी राजू वर्मा यांच्या दुकानातील सीसी कॅमेरे बंद होते. त्यामुळे सीसी कॅमेरे तपासले नाहीत, अशा प्रकारचे आरोप करणे चुकीचे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सीसी कॅमेरे बंद असल्याचे वर्मा यांनीच पोलिसांना सांगितल्याचे समजते. दुसऱ्या एका दुकानात तपासणी सुरू असताना चोरट्याने तेथील तीन सराफांवर आरोप केले नाहीत; मात्र वर्मा यांनाच सोने विक्री के ल्याचे स्पष्ट सांगितले. त्यानुसारच ९० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले.

‘डिटेक्शन’ सुरू होताच सराफ संतापले! गत काही दिवसात खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत २० पेक्षा अधिक चोºया झाल्या आहेत. आतापर्यंत या चोऱ्यांचा तपास थंड बस्त्यात होता; मात्र खदान पोलिसांनी चोरांच्या एक टोळीस अटक करताच, त्यांनी सोने ज्या सराफांना विकले त्यांचे पितळ उघडे पाडणे सुरू केले आहे. बहुतांश चोºयातील विक्री झालेले सोने आता ज्या सराफांकडे आहे, त्यांच्यावर कारवाई होण्याची चिन्हे दिसतानाच सराफ संतापले असून, त्यांनी उलट आरोप सुरू केल्याचे खदान पोलिसांचे म्हणणे आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी