जिल्हा परिषद क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाला प्रारंभ

By Admin | Updated: December 24, 2014 01:09 IST2014-12-24T01:09:52+5:302014-12-24T01:09:52+5:30

अकोला जिल्ह्यातील सातही पंचायत समितीसह जिल्हा परिषद मुख्यालयातील ८00 पेक्षा अधिक खेळाडू आणि कलावंत सहभागी.

Start of District Council Sports and Cultural Festival | जिल्हा परिषद क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाला प्रारंभ

जिल्हा परिषद क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाला प्रारंभ

अकोला - जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन मंगळवारी वसंत देसाई क्रीडांगणावर झाले. या स्पर्धेत सातही पंचायत समितीसह जिल्हा परिषद मुख्यालयातील ८00 पेक्षा अधिक खेळाडू आणि कलावंत सहभागी झाले आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य ज्योत्स्ना चोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. मनोहर तुपकर यांच्याहस्ते झाले. याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद इनामदार, आर.एम. चंदन, जिल्हा परिषद सदस्य डॉ. हि७मतराव घाटोळ, शोभा शेळके, मुख्य लेखा व वित्त अधिकारी गितानागर, कार्यकारी अभियंता प्रभाकर कुंभारे, जिल्हा कृषी विकास अधिकारी गांधी, आरोग्य अधिकारी डॉ. आशीष भारती, गटविकास अधिकारी डॉ. आशिष तापी, डॉ. उमेश देशमुख, के.बी. श्रीवास्तव, एम.बी. मुरकुटे आदींची उपस्थिती होती. उद्घाटन सोहळ्य़ात प्रमुख अतिथींच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली. क्रीडा शिक्षक गजानन डोईफोडे यांनी सर्व खेळाडूंना शपथ दिली. संचालन प्रकाश अंधारे यांनी केले तर आभार राम मेहरे यांनी मानले.

Web Title: Start of District Council Sports and Cultural Festival