शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

काही जीम बाहेरून बंद, आत सुरू; प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 11:17 AM

काही जीम आतमध्ये सुरूच असल्याचे लोकमतने मंगळवारी केलेल्या पाहणीत समोर आले.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : देशात कोरोनाचे पॉझिटिव्ह व संशयित रुग्ण आढळताच राज्य शासनाने शाळा-महाविद्यालय बंद केल्यानंतर मॉल व जीमही बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे; मात्र त्यानंतरही अकोला शहरातील काही जीम संचालकांनी त्यांचे जीम बाहेरून बंद केले; मात्र काही जीम आतमध्ये सुरूच असल्याचे लोकमतने मंगळवारी केलेल्या पाहणीत समोर आले.कोरोना आजाराचे राज्यात ३९ रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. तर संशयितांचा आकडा शंभरावर गेला आहे. जिल्ह्यातही मंगळवारी आणखी २ जणांना तपासणी करुन त्यांचे स्वॅब नमुने घेऊन प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत. कोरोनाचे संशयित अकोल्यात दाखल झाल्याने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कडक सूचना देत जीम बंद ठेवण्याचे सांगितले आहे; मात्र त्यानंतरही अकोला शहरातील जीमचे वास्तव पाहण्यासाठी लोकमतच्या चमूने मंगळवारी सकाळी ६ वाजतापासून ते १० वाजेपर्यंत जीमची पाहणी केली असता ५ ते ६ जीम हे बाहेरून बंद करून आतमध्ये सुरू असल्याचे उघडकीस आले. तर काही जीम संचालकांनी त्यांचे जीम बंद ठेवल्याचेही या पाहणीत समोर आले. शहरातील जीम सुरू आहेत किंवा बंद याची तपासणी किंवा पाहणी मात्र प्रशासनाकडून करण्यात आली नसल्याचेही या पाहणीत उघड झाले.

जीमसमोर वाहनांची गर्दीशहरातील जीम संचालकांनी प्रशासनाला अंधारात ठेवून जीम बाहेरून बंद केले; मात्र आतमध्ये डीजेचा साउंड सुरू असल्याचे दिसून आले. तर जीमच्या खाली वाहनांची मोठी गर्दीही लोकमतने केलेल्या पाहणीत दिसली. यावरून जीम संचालकांनी चतुरी करीत जीम सुरू ठेवले; मात्र वाहनांची गर्दी तसेच गाण्यांचा आवाज जीमच्या बाहेर स्पष्ट येत असल्याचे या पाहणीत उघड झाले.

या भागातील जीमची पाहणीलोकमतच्या विविध चमूने शहराच्या वेगवेगळ्या भागातील जीमची पाहणी केली. यामध्ये गोरक्षण रोड, जठारपेठ, सिव्हिल लाइन्स, मराठा नगर, कौलखेड, रिंग रोड, सिंधी कॅम्प, जुने शहर, डाबकी रोड या परिसरातील जीम सुरू आहेत किंवा बंद याची पाहणी करण्यात आली. यामधील काही जीम आतून सुरू होते, काही ठिकाणी साफसफाई करण्यात येत होती. तर काही जीम सपशेल बंद ठेवले.

वर्कआउट फ्रॉम होमकोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्याच्या उद्देशाने खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील सर्व जीम बंद ठेवण्याचा आदेश आहे. या पृष्ठभूमीवर शहरातील बहुतांश जीम संचालकांनी त्यांचे वर्कआउट स्टेशन बंदच ठेवले आहे. जीममध्ये नियमितपणे येणाऱ्यांचा व्यायाम बंद पडू नये, यासाठी काही जीम संचालकांनी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरूनच त्यांच्या सदस्यांना सूचना देण्याचा फंडा शोधून काढला आहे. कोणता व्यायाम प्रकार करावा, किती अंतर चालावे, एनर्जी ड्रिंक, आहार, फिटनेसबाबतच्या सूचना व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरून देण्यात येत असल्याचे फिटनेस क्लबचे संचालक धनंजय भगत यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAkolaअकोला