शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांकडून सर्वोपचार रुग्णालयाचे ‘पोस्टमार्टेम’!

By admin | Updated: November 2, 2015 02:58 IST

बायोमेडिकल वेस्ट वार्डातच पडून, स्वच्छतेच्या मुद्यावर पालकमंत्र्यांकडून कानउघाडणी.

अकोला- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांची हेळसांड सुरू असून, स्वच्छतेचा बोजवारा उडाला. पालकमंत्री तथा गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी रुग्णालयाला आकस्मिक भेट दिली, तेव्हा हा सर्व प्रकार बघून त्यांनी रुग्णालय प्रशासन व वैद्यकीय अधिकार्‍यांची कानउघाडणी केली. रुग्णांना चांगली सेवा देण्यासाठी कारभार सुधारण्याची सूचना करण्यासोबतच रुग्णालयातील समस्या सोडविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची ग्वाहीसुद्धा त्यांनी यावेळी दिली. सर्वोपचार रुग्णालयात रविवारी दुपारी १ वाजता पालकमंत्र्यांचा ताफा धडकताच प्रशासकीय व वैद्यकीय अधिकार्‍यांची धावाधाव सुरू झाली. त्यांनी प्रत्येक वार्डात जाऊन पाहणी केली असता तेथील अस्वच्छता, रुग्णांना मिळणारी दर्जाहीन सेवा बघून, त्यांनी अधिकार्‍यांना धारेवर धरले. सर्वच वार्डात बायोमेडिकल वेस्ट पडून होते. कुठेही स्वच्छता होत असल्याचे आढळून आले नाही. पालकमंत्री दाखल होताच सफाई कर्मचार्‍यांना बोलावून स्वच्छतेचे काम करण्यात आले. हा सर्व प्रकार कमी होता की काय, वार्डात रुग्णांना वेळेवर औषधोपचारही मिळत नसल्याचे दिसून आले. रुग्णांसोबत होत असलेली हेळसांड यापुढे खपवून घेणार नाही, असा इशारा पालकमंत्र्यांनी अधिकार्‍यांना दिला. स्वच्छता आणि रुग्णसेवेत निष्काळजीपणा करणार्‍या कर्मचारी व अधिकार्‍यांना नोटीस बजावण्याचा आदेश त्यांनी प्रशासकीय अधिकारी राजीव देशमुख यांना दिला. सीटी स्कॅन, क्ष-किरण कक्षाची तपासणी केली. तातडीचे अहवाल वैद्यकीय अधिकार्‍यांना ऑनलाइन मिळतील, अशी व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी पालकमंत्र्यांसोबत महापौर उज्‍जवला देशमुख, हरीश आलिमचंदानी, गोपी ठाकरे, किशोर मालोकार उपस्थित होते.