शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रिलायन्सच्या वाहनांची तोडफोड!

By admin | Updated: August 21, 2014 00:43 IST

जलवाहिनी तोडणे भोवले

अकोला : वारंवार सूचना देऊनही तोडलेल्या जलवाहिन्या दुरुस्त करण्यासाठी टाळाटाळ करणार्‍या रिलायन्स कंपनीच्या मुजोर कर्मचार्‍यांना गोरक्षण रोडवरील नागरिकांनी चांगलाच धडा शिकवला. उपस्थित कर्मचार्‍यांना सळो की पळो करून सोडत कंपनीच्या वाहनांची प्रचंड तोडफोड व नासधूस केल्याची घटना बुधवारी रात्री गोरक्षण रोडवरील व्हीएचबी कॉलनीत घडली. शहराच्या विविध भागात फोर-जी सुविधेसाठी खोदकाम करून फायबर ऑप्टीक केबलचे जाळे पसरविण्याचे काम रिलायन्स कंपनीच्यावतीने सुरू आहे. खोदकाम करताना विविध ठिकाणी जलवाहिन्या व दूरसंचार विभागाच्या केबल्स तोडल्या जात आहेत. जलवाहिन्या दुरुस्त करून देण्याची जबाबदारी कंपनीवर असतानासुद्धा कंपनी अकोलेकरांना ठेंगा दाखवत आहे. असाच प्रकार गोरक्षण रोडवरील व्हीएचबी क ॉलनीत घडला. शहरात पाण्याचे दुर्भिक्ष असून कंपनीने तोडलेल्या ३०० व्यासाच्या जलवाहिनीतून पाण्याचे अक्षरश: लोट वाहत असल्यामुळे संतप्त नागरिकांनी कंपनीच्या उपस्थित कर्मचार्‍यांना हटकले. मुजोर कर्मचार्‍यांनी अरेरावीपणा केल्यामुळे नागरिकांनी रिलायन्सच्या वाहनांवर हल्लाबोल करीत प्रचंड नासधूस केली. ** मनपाचा अभियंता आहे कोठे? कंपनीच्यावतीने ज्या-ज्या भागात खोदकाम केले जाईल, त्यावर देखरेख ठेवण्यासाठी मनपाने बांधकाम विभागातील अभियंत्यांची नेमणूक करणे बंधनकारक आहे. कंपनीच्या कामकाजावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असताना मनपाचा एकही अभियंता हजर राहत नसल्याची माहिती आहे. यामुळे शहरात खोदकाम करताना कंपनी बेलगाम झाल्याचे चित्र समोर येत आहे. ** व्होडाफोन अवतरला कसा?संतापलेल्या नागरिकांनी रिलायन्स नव्हे तर व्होडाफोन कंपनीच्या वाहनांची तोडफोड केल्याचे समोर आले. या ठिकाणी खोदकाम करणारी कंपनी व्होडाफोन असल्याचे मनपा अधिकार्‍यांनी स्पष्ट करताच, व्होडाफोन कंपनीसोबत कधी व कोणता करार झाला, यावर शंका-कुशंकांना ऊत आला. ५० लाखांमध्ये व्होडाफोन कंपनीसोबत करार झाल्याची माहिती आहे.