शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

३८१ गावांत पाणीटंचाई निवारणाच्या ५९० उपाययोजना प्रस्तावित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 15:16 IST

पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांसाठी ९ कोटी ९२ लाख १७ हजार रुपयांचा अपेक्षित खर्च कृती आराखड्यात प्रस्तावित करण्यात आला आहे.

अकोला: जिल्ह्यातील ३८१ गावांमध्ये संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी प्रस्तावित ५९० उपाययोजनांच्या कृती आराखड्यास मंजुरी देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शुक्रवार, २४ जानेवारी रोजी दिला. पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांसाठी ९ कोटी ९२ लाख १७ हजार रुपयांचा अपेक्षित खर्च कृती आराखड्यात प्रस्तावित करण्यात आला आहे.जिल्ह्यातील ग्रामीण भागात येत्या उन्हाळ्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या पृष्ठभूमीवर जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून या कालावधीकरिता दुसºया व तिसºया टप्प्यातील संभाव्य पाणीटंचाई निवारणाचा कृती आराखडा जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत तयार करण्यात आला असून, मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला होता. त्यानुषंगाने जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील ३८१ गावांमध्ये संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी विविध ५९० प्रस्तावित उपाययोजनांच्या कृती आराखड्यास मंजुरी देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी २४ जानेवारी रोजी दिला. संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांसाठी ९ कोटी ९२ लाख १७ हजार रुपयांचा अपेक्षित खर्च कृती आराखड्यात प्रस्तावित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यास जिल्हाधिकाºयांकडून मंजुरी प्रदान करण्यात आल्याने, संबंधित यंत्रणांमार्फत पाणीटंचाई निवारणाची कामे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.अशा आहेत उपाययोजना!पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यात ५९० उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये विहिरींचे अधिग्रहण-१९०, टँकरद्वारे पाणी पुरवठा-१५, प्रगतिपथावरील नळ योजना पूर्ण करणे-१, नळ योजना विशेष दुरुस्ती-६२, तात्पुरत्या पूरक नळ योजना-१२, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती- २३४, नवीन विंधन विहिरी-२७ व नवीन कूपनलिका-३४ इत्यादी उपाययोजनांचा समावेश आहे.कामांसाठी यंत्रणांना घ्यावी लागणार प्रशासकीय मान्यता!पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यास जिल्हाधिकाºयांकडून मंजुरी देण्यात आली असली तरी, आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांची कामे सुरू करण्यासाठी संबंधित यंत्रणांना उपाययोजनांच्या प्रस्तावांना जिल्हाधिकाºयांकडून प्रशासकीय मान्यता घ्यावी लागणार आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाwater scarcityपाणी टंचाई