शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

उरळचे ठाणेदार तडकाफडकी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 11:31 AM

दंगल झाल्यानंतरही कोणताही प्रतिसाद न दिल्यामुळे उरळचे ठाणेदार संजीव राऊत यांना मंगळवारी तडकाफडकी निलंबित करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोहारा येथे दोन समाजात दंगल झाल्यानंतरही घटनास्थळी दाखल न होता तसेच वरिष्ठांना कोणताही प्रतिसाद न दिल्यामुळे उरळचे ठाणेदार संजीव राऊत यांना मंगळवारी तडकाफडकी निलंबित करण्यात आले. आता उरळ पोलीस स्टेशनचा प्रभार सुनील सोळंके यांच्याकडे देण्यात आला आहे.लोहारा येथील नवीन प्लॉटमध्ये दोन गटात एकमेकांवर तुफान दगडफेक केल्याची घटना सोमवारी रात्री घडली.यामध्ये दोन्ही गटाचे दोन जण गंभीर जखमी झाले होते. घटनेची माहिती मिळताच बाळापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासह पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांनी तातडीने धाव घेत घटनास्थळ गाठले. त्यानंतर गावात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला असून, गावात तणावपूर्ण शांतता आहे. या घटनेच्या वेळी ठाणेदार संजीव राऊत हे घटनास्थळावर न दिसल्याने त्यांच्यासोबतच भ्रमणध्वनीवर संपर्क करण्यात आला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.त्यामुळे पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांनी राऊत यांचा शोध घेतला असता ते नसल्याची माहिती मिळाली. गंभीर घटना घडल्यानंतरही ठाणेदार हजर नसल्याने त्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.

वैद्यकीय तपासणी केल्याची माहितीदरम्यान, यावेळी ठाणेदार संजीव राऊत यांची वैद्यकीय तपासणी केल्याची माहिती आहे. त्यानंतर पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेत राऊत यांना तडकाफडकी निलंबित केले. कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर अशाच प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याचेही पोलीस प्रशासनाद्वारे स्पष्ट करण्यात आले.

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिसsuspensionनिलंबन