शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
3
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
4
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
5
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
6
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
7
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
8
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
9
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
10
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
11
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
12
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
13
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
14
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
15
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
16
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
17
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
18
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
19
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
20
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रकोप वाढला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 14:42 IST

अकोला जिल्ह्यातील शेतकºयांने तर चार एकरावरील कापसाचे उभे पीक कापून टाकले आहे.

- राजरत्न सिरसाट

अकोला :आतापर्यंत सुप्त अवस्थेत असलेल्या गुलाबी बोंडअळीचा कपाशीवर प्रकोप वाढला असून,अगोदरच विविध संकटाच्या मालिकांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांवर पुन्हा हे संकट उभे ठाकले आहे.बोंडअळीने त्रस्त अकोला जिल्ह्यातील शेतकºयांने तर चार एकरावरील कापसाचे उभे पीक कापून टाकले आहे.या अस्मानी,सुलतानी संकटाचा सामना करणारा शेतकरी आता धास्तावला आहे.यावर्षी सुरुवातीला पाऊस उशिरा सुरू झाल्याने पेरण्या खोळबंल्या होत्या. पाऊस आला, पेरण्या झाल्या; पण पावसाचा दीर्घ खंड पडल्याने अनेक भागात पेरण्या उलटल्या. शेतकºयांना पेरणी केलेल्या पिकांवर नांगर फिरविला. मूग, उडीद पीक हातचे गेले. उष्ण, दमट वातावरण किडींना पोषक ठरल्याने सोयाबीन पिकावर पाच जातींच्या किडींनी आक्रमण केले. कपाशीवर तुडतुडे, मावासारखी कीड वाढली होती. इतर पिकावरही कीड वाढली. या किडींवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकºयांना तीन ते चार वेळा कीटकनाशक फवारणी करावी लागल्याने खर्च वाढला. या स्थितीचा सामना करीत असतानाच पीक वाढीच्या अवस्थेतच पावसाने झडी लावली. दोन महिने सतत पाऊस पडत होता. सततच्या पावसामुळे शेतात बुरशी तयार झाली. पिकांना व त्यांच्या मुळांना प्रकाशसंश्लेषण होत नसल्याने पिके सडण्याचे प्रकार घडले. पीक परिपक्वतेच्या काळातही पाऊस उसंत देत नव्हता. परतीच्या पावसानेही कहर केल्याने उरले-सुरले पीकही हातचे गेले. सोयाबीन, ज्वारी काळी ठिक्क र पडली. कपाशी पाण्यात भिजली. परिणामी प्रतवारी घसरल्याने या पिकांचे दर बाजारात घटले. नाफेडप्रमाणे व्यापाºयांनही प्रतवारीचे निकष लावल्याने हाती आलेले अल्प पिकांना अल्प दरात विकून शेतकºयांना समाधान मानावे लागत आहे.या परिस्थितीचा सामना करीत असताना बोंडअळीने त्रस्त अकोला जिल्ह्यातील शेतकºयांनी चार एकरावरील कपाशीचे पीक कापून टाकले आहे. यामुळे कृषी शास्त्रज्ञासह कृषी विभागात खळबळ उडाली आहे. ही अळी एका शेतातून वेगाने दुसºया शेतातील कपाशीवर आश्रय घेत कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करते.- कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या सर्वेक्षणसाठी कृषी विद्यापीठाच्या कापूस प्रक्षेत्रावर कामगंध सापळे लावण्यात आले आहेत. त्यात मोठ्या प्रमाणात बोंडअळीचे पतंग सापडले आहेत. अनेक भागातील कापूस पट्ट्यात ही परिस्थिती असू शकते; परंतु शेतकºयांनी घाबरू न न जाता कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार कीटकनाशक फवारणी करावी तसेच कामगंध सापळ््यांचा वापर करावा.डॉ. डी.बी. उंदिरवाडे,विभागप्रमुख कीटकशास्त्र,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीagricultureशेती