शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलपंप धारकांना सव्वातीन लाखांचा फटका!

By admin | Updated: June 17, 2017 01:31 IST

पेट्रोल-डीझल दरबदलाचा परिणाम : पहिल्याच दिवशी नुकसानलोकमत न्यूज नेटवर्क

अकोला: पेट्रोल-डीझलचे दर दररोज बदलण्याचा फटका अकोल्यात पहिल्याच दिवशी बसला. ज्या दराने अकोल्यातील पेट्रोलपंप संचालकांनी पेट्रोलची खरेदी केली होती, त्यापेक्षा स्वस्त दरात १६ जून रोजी पेट्रोलची विक्री करावी लागली. त्यामुळे अकोल्यातील पेट्रोलपंप संचालकांना सव्वातीन लाखांचे नुकसान पहिल्याच दिवशी सहन करावे लागले. हे नुकसान पेट्रोलपंप संचालक आॅइल कंपनीच्या माथी मारणार आहेत.गुरुवारी रात्री पेट्रोल-डीझलचे भाव जाहीर झाले. ज्या भावात अकोल्यातील पेट्रोलपंप संचालकांनी खरेदी केली होती, त्यापेक्षा दीड रुपया कमी दर जाहीर झाले. अकोला जिल्ह्यात एकूण ६३ पेट्रोलपंप आहेत. एका पेट्रोलपंप संचालकांस पहिल्याच दिवशी किमान पाच हजाराचा फटका बसला. पाच हजाराच्या हिशेबाने पहिल्या दिवशीचे पेट्रोलपंप संचालकांचे नुकसान सव्वातीन लाखांच्या घरात गेले.देशभरातील पेट्रोल-डीझलचे दर येत्या १६ जूनपासून दररोज बदलण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला. दर वाढले तर पेट्रोलपंप संचालकांना फायदा आणि दर घसरले तर तोटा यावर आॅइल कंपनी आणि पेट्रोलपंपाचे आर्थिक चक्र यापुढे चालणार आहे. चढ्या भावाने खरेदी केली आणि भाव घसरले तर त्याचा तोटा यापुढे आॅइल कंपनीला सोसावा लागणार आहे. पेट्रोलचे दर रात्रीच जाहीर होत असले तरी त्याची अंमलबजावणी दुसऱ्या दिवशी सकाळी सहापासून केली जाणार आहे. जे पेट्रोलपंप आॅटोमेशन नाही त्या पेट्रोल पंपावर मॅन्युअली दर टाकावे लागत आहे. अकोला शहरातील सहा आणि इतर जिल्ह्यातील असे एकूण ३२ पेट्रोल पंपांचे अजूनही आॅटोमेशन झालेले नाही. तिन्ही आॅइल कंपनीने पेट्रोलपंपाचे आॅटोमेशन करून देण्याचे सांगितले असले तरी अजूनही या प्रक्रियेला सहा ते आठ महिने लागणार आहे. पेट्रोल असूनही जर कुणी पेट्रोलपंप संचालक विक्री बंद ठेवत असेल तर त्याच्यावर ५० हजार ते १ लाख रुपये दंडात्मक कारवाई होईल. जर तक्रार केली गेली तर परवाना रद्दच्या कारवाईचादेखील यामध्ये समावेश आहे. तसेच पुरवठा अधिकारी कधीही कोणत्याही वेळी पेट्रोल पंपांना आकस्मिक भेट देऊन पाहणी करतील.