शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जनता भाजी बाजारात ठरवून दिलेल्‍या वेळेत विक्रीसाठी मुभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:19 IST

अकोला – कोरोना विषाणूचा प्रादुर्भावावर आळा घालण्याच्या दृष्टीने प्रशासनाने अकोला शहरातील जनता भाजीबाजार बंद करण्या संदर्भात १६ एप्रिल रोजी ...

अकोला – कोरोना विषाणूचा प्रादुर्भावावर आळा घालण्याच्या दृष्टीने प्रशासनाने अकोला शहरातील जनता भाजीबाजार बंद करण्या संदर्भात १६ एप्रिल रोजी आदेश निर्गमित करण्यात आले होते. मात्र मंगळवारी सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांसाेबत झालेल्या आढावा बैठकीत जनता भाजी बाजारात ठरवून दिलेल्‍या वेळेत विक्रीसाठी मुभा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांसाेबत झालेल्या आढावा बैठकीच्या अनुषंगाने मनपा आयुक्‍त नीमा अरोरा यांनी बाजार संदभार्त आदेश दिले आहे.

जनता भाजी बाजार हा दिनांक 21 एप्रिल सकाळी 11 वाजता पासून पुढील आदेशापर्यंत ज्यांची जनता बाजार येथे किरकोळ भाजीपाला व फळ व्यवसायाची दुकाने आहेत त्यांनाच भाजीपाला व फळ विक्री करण्यास मुभा राहील. या व्‍यतिरिक्‍त ईतर कोणत्‍याही किरकोळ भाजीपाला व फळ विक्री करण्‍याऱ्याला या ठिकाणी व्‍यवसाय करता येणार नाही सदरची संपुर्ण बाजारपेठ हि सकाळी 7 ते सकाळी 11 वाजे पर्यंतच सुरु ठेवण्‍याची मुभा देण्यात आली आहे

अशा आहेत सूचना

भाजीपाला व फळ हर्रासी करण्याकरिता महात्मा फुले भाजी बाजार - वाशिम रोड व सावित्रीबाई ज्योतीबा फुले भाजी बाजार - लोणी रोड या ठिकाणी व्यवसाय करण्यास मुभा राहील.

महात्मा फुले भाजी बाजार - वाशिम रोड व सावित्रीबाई ज्योतीबा फुले भाजी बाजार - लोणी रोड या ठिकाणी घाऊक व्यवसाय करण्यारिता आवश्यक व्यवस्था असल्यामुळे पर्यायी जागा म्हणुन जनता भाजी बाजाराचा यापुढे हर्रासीकरिता वापर करता येणार नाही.

जनता भाजीबाजार, जुना भाजी बाजार, जैन मंदिर रोड, ओपन थियेटर ते फतेह अली चौक येथे किरकोळ भाजीपाला विक्री करणारे व्यवसायीक यांची भाटे क्लब प्रांगण येथे व्यवसाय करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

किरकोळ भाजीपाला / फळ विक्री करीता व्यवसायीक यांना परवानगी दिलेल्या जागेत कोरोना नियमांचे पालन करुन आपला व्यवसाय करावा. दिलेल्या जागे व्यतिरिक्त इतर ठिकाणी प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये व्यवसाय करीत असल्याचे आढळून आल्यास प्रशासनाकडून कोराना नियमांचे उल्लंघण करीत असल्याचे गृहित धरुन कठोर कारवाई करण्यात येईल.

जनता भाजी बाजार येथे किराणा व जिवनावश्यक वस्तुंच्‍या विक्रींच्‍या व्यवसायास विहित कालावधी करिता व्यवसाय करण्याची मुभा राहील. 0 उपरोक्त व्यवसाय धारकांना व्यवसाय करतांना सोशल डिस्टसिंग नियमाचे पालन करणे तसेच मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील.