शहरं
Join us  
Trending Stories
1
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
2
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
3
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
4
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
5
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
6
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
7
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
8
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
9
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
10
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
11
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
12
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
13
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
14
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
15
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
16
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
17
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
18
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
19
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
20
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

पंचनामे उरकले; पण मदतीचा ‘जीआर’ निघेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 10:54 IST

संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईची मदत केव्हा जाहीर होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अवकाळी पावसाच्या तडाख्यात विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यभरात पिकांचे प्रचंड नुकसान झाले. हाताशी आलेल्या पिकांचे उत्पादन पाण्यात बुडाल्याने, शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यानुषंगाने पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम काही जिल्ह्यांत आटोपले असून, काही जिल्ह्यांत अंतिम टप्प्यात आहे. पीक नुकसानाचे पंचनामे उरकण्याच्या मार्गावर असले तरी, पीक नुकसान भरपाईच्या मदतीचा शासन निर्णय (जीआर) मात्र अद्याप सरकारकडून निघाला नाही. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईची मदत केव्हा जाहीर होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.यावर्षीचा पावसाळा संपल्यानंतर गत महिनाभरापासून अवकाळी पाऊस बरसत आहे. अवकाळी पावसाच्या तडाख्यात विदर्भ-मराठवाड्यासह राज्यभरात शेतातील कापणीला आलेल्या आणि कापणी झालेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. सोयाबीन सडले असून, ज्वारीला कोंब फुटले आहेत. वेचणीला आलेला कापूस भिजला असून, कपाशीच्या बोंड्या सडल्या आहेत. यासोबतच भात, भाजीपाला आणि फळ पिकांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. हाताशी आलेल्या पिकांचे उत्पादन बुडाल्याने, शेतकरी हवालदिल झाला आहे.त्यानुषंगाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा प्रशासनामार्फत पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये पिकांच्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाले असून, काही जिल्ह्यांत अंतिम टप्प्यात आहे. पीक नुकसानाचे पंचनामे उरकण्याच्या मार्गावर असले तरी, पीक नुकसान भरपाईच्या मदतीचा शासन निर्णय (जीआर) अद्याप सरकारकडून काढण्यात आला नाही. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईची मदत सरकारकडून केव्हा जाहीर होणार आणि मदतीचा ‘जीआर’ जिल्हाधिकारी कार्यालयांना केव्हा प्राप्त होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शेतकरी प्रतीक्षेत!अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने, हवालदिल झालेल्या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी पीक नुकसान भरपाईच्या मदतीचा ‘जीआर’ अद्याप सरकारकडून काढण्यात आला नाही. त्यामुळे पीक नुकसान भरपाईची मदत केव्हा आणि किती मिळणार, याबाबत राज्यातील शेतकºयांकडून प्रतीक्षा केली जात आहे.

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी