शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

अधिका-यांच्या मनमानीचा ‘सीएम’समोर वाचणार पाढा

By admin | Updated: December 10, 2014 02:00 IST

भाजप-शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवकांनी नागपूरात ठाण मांडले.

अकोला : मनपा उपायुक्त दयानंद चिंचोलीकर व सहायक पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी शहरात मनमानी कारभार सुरू केल्याचा आरोप करीत भाजप-शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवकांनी मंगळवारी नागपूर येथे ठाण मांडले. उद्या दुपारी मुख्यमंत्र्यांसमोर दोन्ही अधिकार्‍यांच्या कार्यशैलीचा पाढा वाचणार असल्याचे ज्येष्ठ नगरसेवक विजय अग्रवाल यांनी स्पष्ट केले.दुकान व्यावसायिकांना कोणतीही नोटीस किंवा पूर्वसूचना न देता दुकानांचे नामफलक काढण्याची कारवाई उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी २६ नोव्हेंबर रोजी केली होती. या मुद्दय़ावरून भाजप नगरसेवकांनी उपायुक्तांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता, चिंचोलीकरांच्या दालनात ज्येष्ठ नगरसेवक विजय अग्रवाल यांना धक्काबुकी झाल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी नगरसेवक अग्रवाल व उपायुक्त चिंचोलीकर यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात परस्पर तक्रारी नोंदविल्या. उपायुक्तांच्या तक्रारीची दखल घेत, सहायक पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी भादंविच्या कलम १४३, ३५३, ३४१, ३४२, ५0४, ५0६, ४२७ नुसार गुन्हा दाखल करून ८ डिसेंबरच्या मध्यरात्री भाजप नगरसेवक अजय शर्मा यांना राहत्या घरून ताब्यात घेतले. याप्रकरणी भाजप-सेनेच्या पदाधिकार्‍यांनी आक्षेप घेतल्यानंतर नगरसेवक अजय शर्मा यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई न करता त्यांना रात्री २ वाजता सोडून देण्यात आले. एकूणच, पोलिसांच्या विचित्र कारवाईमुळे संतप्त झालेल्या भाजप-सेनेच्या नगरसेवकांनी मंगळवारी नागपूर गाठले. बुधवारी उपायुक्त चिंचोलीकर व सहायक पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे यांच्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली जाणार आहे.