शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

हप्ता नव्हे, किराणा द्या!

By admin | Updated: September 18, 2014 02:43 IST

अकोला महापालिकेच्या एलबीटी विभागातील कर्मचा-यांचे ‘फंडे’.

अकोला : एलबीटीच्या वसुलीत वाढ न होण्यासाठी या विभागातील कर्मचार्‍यांची खाबुगिरी कारणीभूत असल्याचे समोर येत आहे. गुटखा माफियांसोबत असलेल्या ह्यकनेक्शनह्णच्या माध्यमातून महिन्याकाठी ५0 ते ६0 हजारांचा हप्ता वसूल केला जात असतानाच, काही कर्मचारी रोख रक्कम न स्वीकारता चक्क किराणा घरपोच पोहोचविण्याची मागणी करीत असल्याची माहिती आहे. या विभागाची जबाबदारी उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्याकडे असताना असे प्रकार सुरू आहेत, हे येथे उल्ले खनीय. प्रामाणिकतेचा बुरखा चढवलेल्या मनपा अधिकार्‍यांच्या आड अनेक व्यापार्‍यांनी एलबीटीची नोंदणीच केली नाही, तर एलबीटीची नोंदणी करण्यासाठी व्यापारीच उत्सुक नसल्याची दुहेरी चाल मनपाकडून खेळली जात आहे. संबंधित विभागातील अधिकारी, कर्मचार्‍यांनी संबंधित व्यापार्‍यांना अर्थपूर्ण अभय दिले आहे. तत्कालीन उपायुक्त डॉ. उत्कर्ष गुटे यांनी एलबीटी विभागात मर्जीतल्या अधिकार्‍यांची वर्णी लावल्यानंतर एलबीटीच्या नोंदणीपेक्षा हप्ता वसुलीकडे जास्त लक्ष देण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने होलसेल व्यावसायिकांचा समावेश आहे. आयुक्त डॉ. कल्याणकर आल्यानंतर काही अधिकारी, कर्मचार्‍यांचे विभागनिहाय खातेबदल झाले असले तरी ते नावापुरते आहे त. आजरोजी या विभागाची जबाबदारी उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्याकडे असतानासुद्धा, काही कर्मचारी दुकानदारीत गुंतले आहेत. चिंचोलीकरांच्या नाकावर टिच्चून गुटखा माफियांजवळून हजारो रुपयांचा हप्ता वसूल केला असून, काही कर्मचारी रोख रकमेच्या बदल्यात घरपोच किराणा पोहचवून देण्यासाठी आग्रही असल्याचे समोर आले आहे. मनपा क्षेत्रात जकात लागू असताना या विभागात कौशल्याच्या बळावर ठिय्या मांडून बसलेले काही कर्मचारी छुप्या मार्गाने ध्येयप्राप्ती करीत आहेत. या प्रकारांमुळे एलबीटीच्या उत्पन्नात कशी वाढ होईल, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

** व्यापार्‍यांच्या नोंदणीत वाढ का नाही?

व्यवसाय कोणताही असो, वार्षिक ५ लाखापेक्षा आर्थिक उलाढाल असणार्‍या व्यावसायिकांना एलबीटीची नोंदणी करणे क्रमप्राप्त आहे. मनपाने विक्रीकर व आयकर जमा करणार्‍या व्यावसायिकांची जुजबी नोंदणी केली. इतर व्यावसायिकांची नोंदणी करण्यासाठी या विभागाने कोणते प्रयत्न केले, याबद्दल संभ्रम आहे. व्यावसायिकांच्या संख्येत वाढ होत नसल्याचे जाणीवपूर्वक पसरविल्या जात आहे.

**सल्लागार समितीचा उपायुक्तांना गराडा

    उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्या अवतीभोवती पिंगा घालणारे काही अधिकारी-कर्मचारी विविध मुद्यांवर चिंचोलीकरांची दिशाभूल करीत असल्याची माहिती आहे. या सल्लागार समितीमुळे अनेकांची दुकानदारी जोरात सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने मोटारवाहन विभाग, सामान्य प्रशासन विभाग, शिक्षण विभागासह आरोग्य विभागाचा समावेश आहे.