शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरीचे संकेत!

By admin | Updated: September 29, 2014 01:47 IST

मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलल्याची चर्चा.

अकोला : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी संपुष्टात आल्याने, राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हय़ातील पाचही विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे केले असून, मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलल्याची चर्चा असल्याने, या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड खोरी होण्याचे संकेत आहेत. या दोन्ही पक्षाच्या आघाडीत जिल्हय़ातील अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाला होता. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादीने निवडणुकांची घोषणा होण्याआधीच या मतदारसंघात जय्यत तयारी सुरू केली होती. अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्यात यावा, याकरिता जिल्हय़ातील राष्ट्रवादीच्या दिग्गज ने त्यांनी शरद पवार यांना साकडे घातले होते; परंतु आघाडीच तुटल्याने, या दोन्ही पक्षांनी जिल्हय़ातील पाचही विधानसभा मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे अकोला पूर्व या म तदारसंघात एकाच उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे. आकोट विधानसभा मतदारसंघात दोघांच्या नावाची चर्चा होती; परंतु या मतदारसंघात एका नावावर पक्षाने शिक्कामोर्तब केले. बाळापूर व अकोला पश्‍चिम या मतदारसंघात मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने वेळेवर उमेदवारांच्या नावाची घोषणा केली असून, या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. मूर्तिजापूर मतदारसंघात मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या २0 पदाधिकार्‍यांनी पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज केले होते. यातील एका उमेदवाराला उमेदवारी मिळाली आहे. यामुळे पक्षांच्या निष्ठावान नेत्यांची निराशा झाल्याची चर्चा असून, या मतदारसंघात बंडखोरी होण्याची शक्यता आहे. याच मतदारसंघात चार उमेदवारांनी पक्षाच्या नावाने अर्ज दाखल केले असून, जिल्हय़ातील इतरही मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावाने उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत; परंतु पक्ष ज्यांना एबी अर्ज देतील ते उमेदवार अधिकृत असतील, इतरांचे अर्ज मात्र बाद होणार असल्याने पक्षाला चिंता नाही. मूर्तिजापूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या नेत्या तथा जिल्हा परिदष सदस्या प्रतिभा अवचार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.