शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मोरेश्‍वर मोर्शीकर गुरुजी कालवश

By admin | Updated: May 22, 2015 02:04 IST

शिक्षण क्षेत्रातील व्रतस्थ व्यक्तिमत्त्व हरपले

अकोला : अकोल्याच्या शिक्षण क्षेत्रातील व्रतस्थ व्यक्तिमत्त्व मोरेश्‍वर मोर्शीकर गुरुजी यांचे गुरुवार, २१ मे रोजी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर येथील बिलाला हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. विद्यार्थ्यांच्या प्रेमात वाटेकरी नको म्हणून संन्यस्थ जीवन पत्करून त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य विद्यार्थी आणि शिक्षण क्षेत्राला सर्मपित केलं. ह्यअकोल्याचे साने गुरुजीह्ण अशी ओळख असलेल्या मोर्शीकर गुरुजींनी २४ वर्ष अकोल्यातील न्यू इंग्लिश हायस्कूल शाळेचे मुख्याध्यापक म्हणून काम पाहिले. शिक्षण क्षेत्रात निस्वार्थ कार्य करीत असताना त्यांनी केवळ विद्यार्थीच नव्हे, तर उत्तम शिक्षकदेखील घडविले. समाजकार्य आणि शिक्षण क्षेत्राचा विकास करीत असताना ते स्वत: जातीने प्रत्येक क्षेत्रातील गणमान्य व्यक्तींच्या संपर्कात राहायचे. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलेल्या मोर्शीकर गुरुजींनी संपर्कात येणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनातील इंग्रजी विषयाची भीती घालवून लावली. प्रत्येक विद्यार्थ्याला उत्तम शिक्षण मिळावे, याकरिता स्वजाणिवेने प्रत्येक शाळेत जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी व्याकरणाचे धडे दिले. एवढय़ावरच न थांबता त्यांनी स्वत: मोडी लिपीचा अभ्यास केला व जुन्या दस्तऐवजांची उकल व्हावी, याकरिता शासकीय कार्यालयातील कर्मचार्‍यांना मोडीचे प्रशिक्षण दिले. वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनपर भाषणांमध्ये त्यांनी विज्ञान व अध्यात्माची सांगड घालण्याचा प्रयत्न केला. याच जाणिवेतून संस्कृत भाषेत असलेल्या श्रीमद् भगवद गीतेचे त्यांनी इंग्रजी, मराठी व हिंदीमध्ये भाषांतर केले. झब्बा आणि धोतर अशी साधी राहणी असलेल्या गुरुजींची विचारसरणी मात्र उच्च कोटीची होती. मोर्शीकर गुरुजींनी आयुष्यभर सायकलशिवाय दुसरे कोणतेच वाहन चालविले नाही. ऑक्टोबर २0१४ मध्ये सायकलने जात असताना झालेल्या अपघातात त्यांचा एक पाय मोडला. ह्यपाय मोडला, मी नव्हेह्ण असे म्हणत दोन महिन्यातच शहरात पार पडलेल्या ह्यआयएमएह्ण मॅराथॉनमध्ये दौड लावली. ६ मे रोजी पार पडलेल्या ह्यमिस्टाह्णच्या मेळाव्यातील त्यांचे इंग्रजीमधील अध्र्या तासाचे भाषण अखेरचे ठरले. शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल नुकताच त्यांचा एका मराठी वाहिनीने सन्मान केला. ह्यसेवाश्रयह्णच्यावतीनेदेखील त्यांना सेवाश्री पुरस्कार घोषित करण्यात आला. अल्पशा आजारामुळे त्यांच्यावर बिलाला हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. गुरुवार, २१ मे रोजी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.