किरकोळ वादातून मुलीचा विनयभंग, महिलेला शिवीगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 10:49 AM2021-04-12T10:49:54+5:302021-04-12T10:50:00+5:30

Molestation of a girl मुलीला मोबाईल देण्याचे आमिष दाखवून विनयभंग केल्याची घटना १० एप्रिल रोजीच्या सायंकाळी घडली.

Molestation of a girl, abuse of a woman | किरकोळ वादातून मुलीचा विनयभंग, महिलेला शिवीगाळ

किरकोळ वादातून मुलीचा विनयभंग, महिलेला शिवीगाळ

Next

खेट्री : पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशनअंतर्गत सायवणी येथील परस्पर तक्रारीवरून चान्नी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. सायवणी येथील अल्पवयीन मुलीला मोबाईल देण्याचे आमिष दाखवून विनयभंग केल्याची घटना १० एप्रिल रोजीच्या सायंकाळी घडली. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईच्या तक्रारीनुसार शनिवारी रात्री उशिरा सायवणी येथील आरोपी ऋतिक राजनारायण कांबळे याच्याविरुद्ध चान्नी पोलिसांनी भांदवि कलम ३५४ अ, ३५४ ड व पोक्सोनुसार गुन्हा दाखल करून अटक केली. दुसऱ्या गटातील विवाहित महिलेला जातिवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चान्नी पोलिसांनी सायवणी येथील आरोपी श्रीकृष्ण पारस्कर याच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्ट व ५०६ नुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे. चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक गणेश नावकार तपास करीत आहेत.

Web Title: Molestation of a girl, abuse of a woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.