शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव :मानसिकदृष्ट्या कमकुवत अल्पवयीन युवतीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 11:57 IST

एका अल्पवयीन युवतीवर दोघांनी अत्याचार केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे

ठळक मुद्देअल्पवयीन युवती मंगळवारी सायंकाळी काही वस्तू आणण्यासाठी घराबाहेर पडली.गावातीलच एकाने तिने गाठले;लग्नाचे आमीष देऊन निर्जनस्थळी नेत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्याच्या साथीदारानेही तिच्यावर निर्जनस्थळी आणि परिसरातील एका झोपडीत अत्याचार केला.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  तालुक्यातील घाटपुरी येथील एका अल्पवयीन युवतीवर दोघांनी अत्याचार केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. ही घटना मंगळवारी रात्री घडली. घटना उघडकीस येताच शिवाजी नगर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच तातडीने दोघांनाही अटक केली. या घटनेमुळे खामगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. हैद्राबाद येथील दिशा अत्याचार प्रकरण आणि  बुलडाणा जिल्ह्यातील  जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा येथे एका ५५ महिलेवर अत्याचार आणि त्यानंतर तिचा निर्घूण करण्यात आल्याची घटना घडली. या दोन्ही घटनांच्या पडसादाचे मोहोळ शमत तोच, मंगळवारी रात्री खामगाव तालुक्यातील एका मानसिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या कुमारिकेवर दोघांनी अत्याचार केल्याचे समोर आले. घाटपुरी येथील मानसिक दृष्ट्या कमकुवत असलेली एक अल्पवयीन युवती मंगळवारी सायंकाळी काही वस्तू आणण्यासाठी घराबाहेर पडली. त्यावेळी गावातीलच एकाने तिने गाठले. लग्नाचे आमीष देऊन निर्जनस्थळी नेत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्याच्या साथीदारानेही तिच्यावर निर्जनस्थळी आणि परिसरातील एका झोपडीत अत्याचार केला. बराच वेळ उलटल्यानंतरही ती घरी न परतल्याने घरातील मंडळींनी शोध घेतला असता हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान तिने सर्व हकीकत कथन केल्यानंतर घरातील मंडळींनी तिला सोबत घेत, पोलिस स्टेशन गाठले. घटनेची माहिती मिळताच   पोलिस निरिक्षक रविंद्र देशमुख यांनी आपल्या पथकासह घटनास्थळ गाठले. गावात शोध मोहिम राबवून दोन आरोपींना अटक केली आणि दोन्ही आरोपी विरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले.ज्ञानेश्वर तायडे आणि दत्ता साठे  अशी आरोपींची नावे आहे. आरोपी विरोधात भादंवी ३७६(डी), ३७६(२),(आय), बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ कलम -५ (ग), ५ (क) आणि कलम ६ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास शिवाजी नगर पोलिस करीत आहेत. 

टॅग्स :khamgaonखामगावCrime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार