शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

महापौर पद की विधानसभा उमेदवारी?

By admin | Updated: September 4, 2014 01:26 IST

अकोला महापौर पद की विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी यामध्ये राजकीय वर्तुळात गोंधळाची स्थिती.

अकोला : महापौरपदाच्या निवडणुकीची तारीख निश्‍चित होताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मात्र विधानसभा निवडणुकीच्या तिकिटासाठी पक्षाची मनधरणी करणार्‍या इच्छुकांसमोर राजकीय पेच निर्माण झाला असून, महापौरपद की विधानसभा, या विचाराने इच्छुकांचा गोंधळ उडाला आहे. यामध्ये प्रामुख्याने भाज पमधील इच्छुकांचा समावेश आहे.ज्योत्स्ना गवई यांच्या महापौरपदाचा कालावधी येत्या ९ सप्टेंबर रोजी संपुष्टात येत आहे. त्यानुषंगाने आगामी अडीच वर्षांच्या कालावधीसाठी नवीन महापौर निवडीला राजकीय घडामोडींना वेग आला. सद्यस्थितीत सत्तापक्ष काँग्रेस आघाडीकडे ३६ नगरसेवक तर विरोधी पक्ष भाजप-शिवसेनेकडे सुद्धा ३६ नगरसेवकांचे संख्याबळ असल्याने निवडणुकीत प्रचंड चुरस होणार असल्याचे संकेत आहेत.भाजपप्रणीत महानगर सुधार समितीमध्ये काही आघाडीचे नगरसेवक असल्याने त्यांचे मत नेमके कोणाच्या पारड्या त जाईल, यावरही महापौरपदाचा खेळ अवलंबून आहे. हीच परिस्थिती काँग्रेस आघाडीत आहे. समाजवादी पार्टी, युडीएफसह काही अपक्ष नगरसेवकांना सांभाळून ठेवण्याची कसरत काँग्रेस आघाडीपेक्षा इच्छुक उमेदवारालाच जास्त करावी लागणार असल्याची माहिती आहे. अर्थातच, फोडाफोडीच्या राजकारणापेक्षा एकमेकांना सांभाळून ठेवण्याच्या राजकारणाला सुरुवात झाली असून अपेक्षांची पूर्तता करण्याकडे अनेकांचा कल आहे. या धामधुमीत विधानसभा निवडणुकीच्या तिकिटासाठी वरिष्ठांची मनधरणी करणार्‍या इच्छुकांना महापौरपदाची ह्यऑफरह्ण करण्यात आल्याने संबंधितांचा चांगलाच गोंधळ उडाला आहे. एकीकडे अडीच वर्षांच्या कालावधीसाठी महापौरपद खुणावत असतानाच, दुसरीकडे पाच वर्षांच्या संभाव्य आमदारकीवर पाणी फेरावे लागणार. दोन्ही निवडणुकीचा खर्च लक्षात घेतल्यास महापौरपदापेक्षा विधानसभेची निवडणूक जड जाण्यासोबतच निवडून येण्यावरही संभ्रमावस्था आहे. याची पूर्ण जाणीव संबंधी तांना असल्याने त्यांनी महापौरपदासाठी लक्ष केंद्रीत केल्याची माहिती आहे. काँग्रेसमधील इच्छुकांचा निर्णय प्रदेशाध्यक्षांच्या दरबारात होईल, मात्र उपमहापौरपदासह स्थायी समिती सभापतीपदाच्या इच्छूक उमेदवारासाठी प्रचंड माथापच्ची सुरु झाली आहे. *अपक्ष नगरसेवक भाजपच्या गळाला!मनपातील सत्ता ताब्यात घेण्यासाठी भाजपमध्ये जोरदार हालचाली सुरू आहेत. काँग्रेस आघाडीत सामील झालेले अपक्ष व काही आघाडीचे नगरसेवक भाजपसोबत काम करण्यास इच्छुक आहेत. गतवेळी ऐनवेळेवर संबंधित नगरसेवकांनी ह्ययु टर्नह्ण घेतल्यामुळे भाजपला सत्तेपासून वंचित राहावे लागले होते. यंदा मात्र परिस्थिती बदलण्याची चिन्हं आहेत.