नागपूरची विवाहिता, प्रियकर पोलिसांच्या ताब्यात

By Admin | Updated: July 17, 2017 03:08 IST2017-07-17T03:08:48+5:302017-07-17T03:08:48+5:30

अकोला : नागपूर येथील विवाहितेला घेऊन तिचा प्रियकर नवीन बसस्थानकावर रविवारी दुपारी मिळून आल्याने सिव्हिल लाइन पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

The marriage of Nagpur, under the custody of the beloved police | नागपूरची विवाहिता, प्रियकर पोलिसांच्या ताब्यात

नागपूरची विवाहिता, प्रियकर पोलिसांच्या ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : नागपूर येथील विवाहितेला घेऊन तिचा प्रियकर नवीन बसस्थानकावर रविवारी दुपारी मिळून आल्याने सिव्हिल लाइन पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केल्यावर विवाहितेच्या सहमतीनेच प्रियकराने तिला अकोल्यात आणले. रात्री पोलिसांनी विवाहितेला तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.
नागपूर येथील २८ वर्षीय विवाहितेचे तेथीलच युवकासोबत प्रेमसंबंध जुळले. विवाहिता पतीपासून वेगळी राहत असून, तिला एक आठ वर्षांचा मुलगा आहे. विवाहितेच्या सहमतीनेच प्रियकराने तिला रविवारी अकोल्यात आणले. युवकाची वहिनी एका गावात राहत असल्याने, युवक तिला तेथे घेऊन जाणार होता. रविवारी दुपारी नवीन बसस्थानकावर बसगाडीची वाट पाहत असताना, पोलीस कर्मचाऱ्यांना हे जोडपे दिसून आले. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी चौकशीसाठी दोघांना ताब्यात घेतले आणि सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी चौकशी केल्यावर विवाहितेच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली. रात्री तिचे कुटुंबीय अकोल्यात आल्यावर पोलिसांनी विवाहितेला त्यांच्या स्वाधीन केले आणि युवकाला सोडून दिले.

Web Title: The marriage of Nagpur, under the custody of the beloved police