शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

अकोलेकर कन्येच्या ‘जरबेरा’ची र्जमनीपर्यंत झेप

By admin | Updated: December 9, 2014 00:44 IST

श्रुती वानखेडेच्या संशोधनाची घेतली दखल.

अकोला- पुष्पगुच्छांची शोभा वाढविणार्‍या जरबेरासारख्या फुलांचे पीक विदर्भातील उष्ण वातावरणातही घेता येऊ शकते, यावर संशोधन करणारी अकोलेकर कन्या डॉ. श्रुती वानखेडे यांच्या संशोधनाची दखल र्जमनीने घेतली आहे. त्यांनी जरबेराच्या १३ जातींवर केलेल्या संशोधनावर र्जमनीतील लॅबर्ट प्रकाशनाने पुस्तक प्रकाशित केले असून, त्याला आंतरराष्ट्रीय पुस्तक मानांकनही मिळाले आहे. अकोला जिल्ह्यातील कुरुम येथील मूळ रहिवासी असलेल्या डॉ. श्रुती वानखेडे या औरंगाबाद येथील शाहू महाराज कृषी महाविद्यालयात सहायक प्राध्यापिका आहेत. या अकोलेकर कन्येने स्नातकोत्तर पदवीकरिता ह्यजरबेराह्ण हा विषय निवडला होता. नागपूर येथील सातुपडा बॉटनिकल गार्डनमध्ये त्यांनी या विषयावर संशोधन केले. विदर्भासारख्या उष्ण हवामान असलेल्या प्रदेशात जरबेरासारख्या नाजूक फुलांचे पीक घेता येऊ शकते, हे त्यांनी संशोधनातून सिद्ध केले. त्यासाठी जरबेराच्या वेगवेगळ्य़ा १३ जातींची त्यांनी निवड केली. शेडनेटच्या मदतीने फुलांचे पीक मोठय़ा प्रमाणावर घेऊ शकतो, हे त्यांनी सखोल अभ्यास करून त्यांच्या संशोधनात मांडले आहे. या संशोधनादरम्यान त्यांनी सूक्ष्म निरीक्षणे नोंदविली. विदर्भाच्या मातीत विविध प्रजातींची पिके कशाप्रकारे घेतली जाऊ शकतात, याची काटेकोर तपासणी केली. शेडनेटमध्ये जरबेराचे पीक घेताना कोणत्या प्रजातीची निवड करावी, यावर त्यांनी संशोधन केले. त्यांच्या या संशोधन प्रबंधाची दखल र्जमनीतील लॅबर्ट प्रकाशनाने घेऊन त्यावर पुस्तक प्रकाशित केले. महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठातून अशाप्रकारे संशोधन करणार्‍या त्या पहिल्याच संशोधक ठरल्या आहेत. जरबेरा हे पीक शेतकर्‍यांसाठी वरदान ठरणारे आहे. विदर्भात शेडनेटच्या माध्यमातून ही फूलशेती केल्यास त्यातून आर्थिक संपन्नता मिळू शकते. त्यामुळे या फुलांच्या शेतीबाबत संशोधन केले. त्यावरील प्रबंधाची दखल र्जमनीतील प्रकाशनाने घेतली. ही केवळ माझ्यासाठीच नाही तर संपूर्ण विदर्भासाठी अभियानाची बाब असल्याचे डॉ. श्रुती वानखेडे यांनी लोकमतशी बोलताना सांगीतले.