शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मागासवर्गीयांच्या कोट्यवधींच्या खर्चाला खो

By admin | Updated: May 31, 2017 01:43 IST

‘पीआरसी’पुढे निघणार वाभाडे : २०१२ मधील पिको मशीनचे वाटप अद्यापही नाही!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून मागासवर्गीयांसाठी राखीव कोट्यवधी रुपयांचा निधी अखर्चित ठेवण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यातच २०११-१२ मध्ये पुरवठादाराने केवळ १०० नग पिको मशीनचा पुरवठा केल्याने त्यातील उर्वरित ५९८ लाभार्थींना अद्यापही मशीनचा पुरवठा झाला नसल्याची माहिती आहे. या मुद्यांवर अधिकारी चांगलेच तोंडघशी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेच्या सेसफंडातून २० टक्के निधी मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी खर्च करावा लागतो. त्यानुसार २०११-१२ मध्ये १ कोटी ८८ लाख, २०१०-११ या वर्षातील अनुशेष १ कोटी ५७ लाख मिळून ३ कोटी ४६ लाख रुपयांतून मार्च २०१२ अखेर केवळ १ कोटी ४ लाख रुपये खर्च करण्यात आले. त्यातून २ कोटी ४२ लाख निधी अखर्चित राहिला. त्यापैकी ३० टक्के रक्कम महिलांवर खर्च करणे आवश्यक असताना त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले. यापुढे असा प्रकार घडणार नाही, अशी दक्षता घेण्याचे जिल्हा परिषदेचे म्हणणे आहे. सोबतच वेळापत्रकानुसार योजना राबवल्या जातील, शासकीय, निमशासकीय सेवेत असलेल्या कुटुंबांतील सदस्याला लाभ दिला जाणार नाही, असेही जिल्हा परिषदेला मान्य करावे लागणार आहे. पिको मशीन पुरवठादाराला सोडलेमार्च २०१२ मध्ये ५९८ पिको मशीन पुरवठ्यासाठी श्रीनाथ जनरल स्टोअर्स अहमदनगर यांना कंत्राट देण्यात आले. त्यावेळी पुरवठादाराने केवळ १०० मशीनचा पुरवठा केला. त्यापैकी ५१ मशीनचे वाटप करण्यात आले. उर्वरित मशीन पुरवठा करण्यासही कंत्राटदाराने नकार दिला. त्याच्यावर कोणतीच कारवाई न करता जिल्हा परिषदेने सोडून दिले. ही बाबही संबंधितांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.१२ वर्षांपासून १५८ कामे अपूर्णदलित वस्ती सुधार योजनेंतर्गत सिमेंट रस्ते, नाली, स्मशानभूमी, पाणीपुरवठा, समाज मंदिर, पथदिवे या प्रकारची २००४-०५ ते २०१०-११ या काळात १२६० कामे मंजूर करण्यात आली. त्यापैकी सद्यस्थितीत १५८ कामे अद्यापही अपूर्ण आहेत. त्यामध्ये ७८ कामे पाणीपुरवठा योजनांची आहेत. त्या ठिकाणी पाण्याचा स्रोत न मिळाल्याने कामे अपूर्ण असल्याचे सांगण्यात येत आहे, तसेच वसुलीही केली जात असल्याची माहिती आहे; मात्र ती कुठेच झालेली नाही, हे विशेष.