शहरं
Join us  
Trending Stories
1
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
2
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
3
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
4
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
5
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
6
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
7
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
8
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
9
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
10
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
11
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
12
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
13
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
14
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
15
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
16
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
17
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
18
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
19
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
20
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

निविष्ठा विक्रीत अनियमितता; तीन कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित, पाच केंद्रांना नोटीसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 13:50 IST

कृषी निविष्ठा विक्रीत अनियमितता आढळल्याने जिल्ह्यात तीन कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले असून, इतर पाच केंद्रांना नोटिसा बजावत त्रुटीबाबत ताकीद देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी (एसएओ) बुधवार ३० एप्रिल रोजी दिला.

अकोला : कृषी निविष्ठा विक्रीत अनियमितता आढळल्याने जिल्ह्यात तीन कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले असून, इतर पाच केंद्रांना नोटिसा बजावत त्रुटीबाबत  ताकीद देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी (एसएओ) बुधवार ३० एप्रिल रोजी दिला.

येत्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी निविष्ठांच्या खरेदी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाच्या पथकांनी केलेल्या तपासणीत निविष्ठा विक्रीत अनियमितता आढळलेल्या जिल्ह्यातील आठ कृषी सेवा केंद्रांची सुनावणी घेण्यात आली. त्यामध्ये समाधानकारक स्पष्टीकरण दिले नसल्याने अकोट येथील अकोट जिनिंग अँड प्रेसिंग सहकारी फॅक्टरी लि. २ महिने, चोहोट्टा बाजार येथील जयेश ॲग्रो सेंटर २ महिने आणि   पातुर तालुक्यातील आलेगाव येथील तायडे ॲग्रो सेंटरचा परवाना १ महिन्याच्या कालावधीसाठी निलंबित करण्यात आल्याचा आदेश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. मुरली इंगळे यांनी दिला. 

तपासणीत आठ केंद्रांत आढळल्या नियमबाह्य बाबी

कृषी विभागाच्या जिल्हा आणि तालुकास्तरीय भरारी पथकांनी जिल्ह्यातील विविध कृषी केंद्रांची अचानक तपासणी केली होती. या तपासणीत आठ कृषी सेवा केंद्रांमध्ये नियमबाह्य बाबी आढळून आल्या होत्या. त्यामध्ये प्रामुख्याने नोंदणी प्रमाणपत्र ग्राहकास दिसेल असे न लावणे, गोदामातील प्रत्यक्ष साठा आणि मशीनवरील साठ्यामध्ये मोठी तफावत असणे, शेतकऱ्यांना अधिकृत पक्के बिल (पावती) न देणे, साठा फलक आणि दर फलक अद्ययावत न ठेवणे या तक्रारींच्या अनुषंगाने संबंधित आठ कृषी सेवा केंद्रचालकांची जिल्हा स्तरावर सुनावणी घेण्यात आली. त्यात  तीन कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली.

विक्रेत्यांनी काळाबाजार करू नये; कृषी विभागाचा इशारा

येत्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात बियाणे आणि खतांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. मात्र, विक्रेत्यांनी कोणत्याही प्रकारचा काळाबाजार किंवा 'लिंकिंग' करू नये, असा इशारा कृषी विभागाने  दिला आहे.

शेतकऱ्यांनी बियाणे व खते खरेदी करताना अशी घ्यावी काळजी

शेतकऱ्यांनी  नामांकित कंपन्यांच्या निविष्ठांना प्राधान्य द्यावे, खरेदी केल्यानंतर विक्रेत्याकडून पक्के बिल घ्यावे, बिलावर लॉट नंबर आणि किंमत तपासून घ्यावी, असे आवाहन असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Irregularities in input sales: Licenses of three centers suspended.

Web Summary : Three agricultural service center licenses suspended in Akola due to input sales irregularities. Five others received notices. The action follows inspections revealing discrepancies in stock and billing practices before the Kharif season. Farmers are urged to prioritize reputable brands and verify bills.
टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी