टोळीने गुन्हे करणारी तीन जणांची टोळी दोन वर्षांसाठी हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:17 IST2021-04-13T04:17:30+5:302021-04-13T04:17:30+5:30

पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांचा आदेश अकोला : शहरासह जिल्हाभरात टोळीने गुन्हे करणाऱ्या तीन जणांच्या टोळीला पोलीस अधीक्षक जी. ...

A gang of three criminals was deported for two years | टोळीने गुन्हे करणारी तीन जणांची टोळी दोन वर्षांसाठी हद्दपार

टोळीने गुन्हे करणारी तीन जणांची टोळी दोन वर्षांसाठी हद्दपार

पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांचा आदेश

अकोला : शहरासह जिल्हाभरात टोळीने गुन्हे करणाऱ्या तीन जणांच्या टोळीला पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशाने जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. आतापर्यंत पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने जिल्ह्यातील सुमारे २९ टोळ्यांना हद्दपार करण्यात आले आहे.

बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पळसो बढे येथील रहिवासी गजानन नरसिंग डाबेराव, वय ६३ वर्षे, त्याचा मुलगा विक्की गजानन डाबेराव, वय २५ वर्षे, रा. पळसो बढे आणि बोरगाव मंजू येथील रहिवासी शेख सद्दाम शेख गणी, ३० वर्षे हे तिघे जण जिल्ह्याच्या विविध भागांत टोळीने गुन्हे करीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांना मिळाली. या माहितीवरून तिन्ही गुन्हेगारांवरील गुन्हेगारीची मालिका पाहता त्यांनी या तिघांविरुद्ध हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. यावरून बोरगाव मंजू पोलिसांनी या तीन गुन्हेगारांविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती पोलिसांकडे सादर केली. बोरगाव मंजू पोलीस ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागांत या तिघांनीही टोळीने अनेक गुन्हे केल्याचे समोर आले. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक, तसेच त्यांना सुधारण्यासाठी वारंवार कारवाई करण्यात आली. मात्र, तिन्ही गुन्हेगार पोलिसांच्या या कारवाईला जुमानत नसल्याने पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशाने या तिन्ही गुन्हेगारांना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हा आदेश सोमवारी दिला असून, टोळीला जिल्ह्याच्या बाहेर काढण्यात आले आहे.

Web Title: A gang of three criminals was deported for two years