शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
3
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
4
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
5
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
7
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
9
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
10
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
11
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
12
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
13
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
14
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
15
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
16
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
17
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
18
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
19
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
20
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस निवासस्थानांच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा

By admin | Updated: May 16, 2015 00:51 IST

पाच कोटींच्या कामांना तांत्रिक मंजुरी.

अकोला: शहरातील पोलीस कर्मचार्‍यांच्या शासकीय निवासस्थानांच्या दुरुस्ती कामांसाठी पाच कोटींच्या अंदाजपत्रकांना सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ७ मे रोजी तांत्रिक मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस कर्मचारी निवासस्थानांच्या दुरुस्ती कामांचा मार्ग मोकळा झाला आहे. अकोला शहरात विविध ठिकाणी असलेली पोलीस कर्मचार्‍यांची शासकीय निवासस्थाने मोडकळीस आली आहेत. या पृष्ठभूमीवर शहरातील पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचार्‍यांच्या शासकीय निवासस्थानांच्या दुरुस्ती कामांसाठी ५ कोटींच्या कामांना शासनामार्फत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार शहरातील पोलीस मुख्यालय, अनिकट, रामदासपेठ पोलीस ठाणे परिसरातील पोलीस कर्मचार्‍यांच्या निवासस्थानांसह पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षकांच्या शासकीय निवासस्थानांच्या दुरुस्ती कामांसाठी सार्वजनिक बांधकाम अकोला विभागामार्फत अंदाजपत्रके तयार करण्यात आली. पाच कोटींच्या या कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अमरावती येथील मुख्य अभियंत्याकडून ७ मे रोजी तांत्रिक मंजुरी देण्यात आली. या कामांची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, निविदा निश्‍चितीनंतर पोलीस कर्मचार्‍यांच्या शासकीय निवासस्थानांच्या दुरुस्तीची कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरातील मोडकळीस असलेल्या पोलीस निवासस्थानांच्या दुरुस्ती कामांचा मार्ग मोकळा झाला आहे.