शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

इलेक्ट्रिक मीटर देण्याच्या नावाखाली फसवणूक!

By admin | Updated: May 31, 2017 01:43 IST

अकोला: इलेक्ट्रिक मीटर देण्याच्या नावाखाली नागरिकांकडून प्रत्येकी १0७0 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम घेऊन बनावट पावती देणाऱ्या दोघांना जुने शहर पोलिसांनी मंगळवारी अटक केली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: इलेक्ट्रिक मीटर देण्याच्या नावाखाली नागरिकांकडून प्रत्येकी १0७0 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम घेऊन बनावट पावती देणाऱ्या दोघांना जुने शहर पोलिसांनी मंगळवारी अटक केली. पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांना ३ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दोन वर्षांपूर्वी जुने शहर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध १७ जणांनी इलेक्ट्रिक मीटर देण्याच्या नावाखाली पैसे घेऊन फसवणूक केल्याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी काही आरोपींना अटकसुद्धा केली होती; परंतु या प्रकरणात इलेक्ट्रिक मीटर देण्याच्या नावाखाली नागरिकांकडून पैसे उकळणाऱ्या टोळीला वीज वितरण कंपनीच्या बनावट पावत्या बनवून देणारे योगेश ढवळे व सुरेश खेते हे दोघे दोन वर्षांपासून फरार होते. इलेक्ट्रिक मीटर देण्याच्या नावाखाली नागरिकांकडून पैसे घेणारे किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याचे सांगून हजारो रुपये उकळणाऱ्या टोळीला ढवळे व खेते बनावट पावत्या देत होते. या पावत्या नागरीकांना देऊन त्यांच्याकडून ही टोळी पैसे घेत होती. त्यासाठी ढवळे व खेतेलासुद्धा एका पावतीमागे २00 ते ३00 रुपये मिळत होते. योगेश ढवळे व सुरेश खेते अकोल्यात आल्याची माहिती जुने शहरचे ठाणेदार भाऊराव घुगे व पथकाला मिळाली. पोलिसांनी त्यांच्या घरी छापा घालून त्यांना अटक केली. दोघांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले. पोलिसांनी आरोपींकडून बनावट पावत्या जप्त करायच्या आहेत असे सांगत, आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने दोघांना ३ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.