शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

 दिवसभरात चौघांचा मृत्यू; ६२ नवे पॉझिटिव्ह, १९१ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 18:23 IST

शुक्रवार २५ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात आणखी चार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २२१ वर गेला.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून , शुक्रवार २५ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात आणखी चार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २२१ वर गेला. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ६२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ७००४ झाली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शुक्रवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे ३०४ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ६२ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २४२ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील सहा, मुर्तिजापूर येथील पाच, डाबकी रोड, कौलखेड, अकोट येथील प्रत्येकी तीन्, सिरसो ता.मुर्तिजापूर, चोहट्टा बाजार, जऊळका येथील प्रत्येकी दोन, लहान उमरी, वाशिम बायपास, न्यु खेतान नगर, मोठी उमरी, जूने शहर, गोकूल कॉलनी, तापडीया नगर, सिंधी कॅम्प, अकोली जहागीर, बोर्डी ता. अकोट व करोडी येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये बार्शीटाकळी व आदर्श कॉलनी येथील प्रत्येकी चार, चिंचोली रुद्रायणी, मुर्तिजापूर व एलआयसी क्वॉर्टर येथील प्रत्येकी दोन, पळसो-बढे, सोनखेड, वानखडे नगर, बोरगाव मंजू, चांदूर, रामनगर, सिंधी कॅम्प, तापडीया नगर, वाशिम बायपास, उमरी व फिटे प्लॉट येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.एक पुरुष, तीन महिलांचा मृत्यूशुक्रवारी आणखी चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये वाशिम बायपास येथील ७५ वर्षीय महिला, मुर्तिजापूर येथील ४० वर्षीय पुरुष, पाथर्डी ता. तेल्हारा येथील ७० वर्षीय महिला व डाबकी रोड, अकोला येथील ५० वर्षीय महिला या चौघांचा समावेश आहे.१९१ जणांना डिस्चार्जशासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून ५९, कोविड केअर सेंटर, अकोला येथून सहा, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, ओझोन हॉस्पीटल येथून एक, युनिक हॉस्पीटल येथून चार, आयुर्वेदीक महाविद्यालय येथून एक, हॉटेल रिजेन्सी येथून चार व कोविड केअर सेंटर, बाळापूर येथून चार जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तसेच होम क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झाला अशा ११० जणांना अशा एकूण १९१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.१,४४८ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७,००४ लोकांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ५३३५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २२१ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १,४४८ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला