शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून जिल्ह्यातील शेतकरी संपावर!

By admin | Updated: May 31, 2017 01:52 IST

नियोजनही तयार; मूर्तिजापुरातून अनेकांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर: शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. लागवडीचा खर्च निघेनासा झाला आहे. शासनाचे धोरण कळायला मार्ग नाही. विदेशातून धान्य, कडधान्य आयातीचे प्रकार सुरू आहेत. फळे, भाजीपाला कवडीमोल दराने विकण्याची वेळ आली आहे, त्यामुळे ३१ मेच्या रात्री बारा वाजेपासून शेतकरी संपावर जाणार आहेत. कर्जमुक्ती आणि हमीभाव घेण्यासाठी अकोला जिल्ह्यातील शेतकरीही १ जूनपासूनच्या संपात सहभागी होणार आहेत. त्यासाठीचे नियोजन आणि पुढील वाटचाल मूर्तिजापुरात ठरली आहे. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी पुढे आले आहेत. सोबतच मराठा क्रांती मोर्चाही किसान क्रांतीसोबत असल्याचेही निश्चित झाले आहे.भाजप शासनाच्या काळात आत्महत्यांच्या प्रमाणात ४० टक्के वाढ झाली. शासनाला आणखी किती बळी हवे आहेत, सातव्या वेतन आयोगाला, समृद्धी महामार्गासाठी निधी आहे, शेतकऱ्यांसाठी का नाही, असा विचार आता शेतकरी करीत आहेत. त्या प्रश्नांच्या उत्तरातच शासनाची शेतकऱ्यांविषयी असलेली कळकळ स्पष्ट होते. स्वामिनाथन आयोग लागू करू, सात-बारा कोरा करू, हे मुद्दे निवडणूकपूर्व जाहीरनाम्यात भाजपने घेतले होेते. आता विधानसभेत कर्जमुक्तीचा ठराव का मांडला जात नाही, याचाही विचार करण्याची वेळ आली आहे. त्यामुळेच एक जूनपासून शेतकऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याचे रविवारी मूर्तिजापूर येथे किसान क्रांतीचे प्रदेश समन्वयक जयाजीराव सूर्यवंशी यांनी सांगितले. त्यानुसार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती, आठ तास मोफत वीज, मोफत ठिबक, दुधाला ५० रुपये लीटर हमीभाव, शेतीसाठी बिनव्याजी कर्जपुरवठा, फळे व भाजीपाल्यास हमीभाव, स्वामिनाथन आयोग, उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा धरून हमीभाव, शेतकरी विरोधी कायदे रद्द करणे, या मागण्यांसाठी हा संप केला जात आहे. त्याचवेळी मंत्रीपद सोडून येत असतील तर सदाभाऊंनाही सोबत घेतले जाईल, असेही किसान क्रांतीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे विजय काकडे, प्राचार्य डॉ. श्रीकांत तिडके, जनमंचचे प्रा. सुधाकर गौरखेडे, अरुण बोंडे, राजू पाटील वानखडे, शेतकरी नेते प्रकाश बोनगिरे, विजय लोडम, देवीदास बांगड, पुंडलिकराव भारंबे, शेतकरी संघटनेचे जिल्हाप्रमुख सुरेश जोगळे, प्रा.पी.एम. पाटील यावेळी उपस्थित होते.