शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

सावधान...चॅलेंजचा फेसबुक ट्रेंड ठरतोय घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 12:59 PM

विनाकारणच घराची इज्जत घालवू नका, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

- सचिन राऊत

अकोला : कपल चॅलेंज, फॅमिली चॅलेंज, सिंगल चॅलेंज, खाकी चॅलेंज असे वेगवेगळे चॅलेंज स्वीकारून स्वत:चे व आपल्या कुटुंबीयांचे फोटो फेसबुकवर अपलोड करीत असाल, तर सावधान!तुम्ही स्वत: अपलोड केलेल्या या फोटोचा सायबर गुन्हेगार गैरवापर करून तुमच्या सुखी संसारात आग लावत असल्याच्या घटना घडल्या असून, आता या ट्रेंडला बळी पडणाऱ्यांचे धोके वाढले आहेत. त्यामुळे कोणीही याच्या लेनच्या नादात कुटुंबातील महिलांचे फोटो फेसबुक किंवा तत्सम सोशल माध्यमांवर अपलोड करून विनाकारणच घराची इज्जत घालवू नका, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. चॅलेंजचा असा आहे ट्रेंडफेसबुकवर वेगवेगळ्या चॅलेंजच्या नावाखाली स्वत:चे व परिवाराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. त्याला बळी पडून अनेक जण पत्नीसोबतचे फोटो अपलोड करीत आहेत. कुणी नववारीत तर कुणी सूटमध्ये, कुणी पारंपरिक तर कुणी पाश्चात्त्य पेहराव परिधान करून हा चालेंज स्वीकारण्याच्या नादात अनेक जण धोक्याला परवानगी देत आहेत. असा होईल धोकाकपल चॅलेंज नावाने फेसबुकवर सर्च केले असता हजारो दाम्पत्यांचे फोटो त्यांना सहज उपलब्ध होत आहे. विकृत गुन्हेगार एका महिलेच्या ठिकाणी दुसºया महिलांचे मार्फ (एडिट) करून ते अश्लील छायाचित्र नातेवाइकांना किंवा मित्र परिवारांना पाठवून संबंधित महिलेचे कौटुंबिक आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. तिला ब्लॅकमेल केले जाऊ शकते. त्यामुळे वेळीच सावध होणाचे आवाहन पोलिसांनी केले आहे. पोलिसांकडे तक्रार कराअशा प्रकारचे अनेक गैरप्रकार यापूर्वी घडले आहेत. त्यामुळे नागरिकांनी वेळीच सावध होऊन अशा कोणत्याही चॅलेंजच्या नादात आपले अथवा पत्नीचे, मुलींचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करू नये, असे पोलिसांनी आवाहन केले आहे. ज्यांनी फोटो अपलोड केले आणि कुणाला सायबर गुन्हेगार ब्लॅकमेल करत असेल तर त्यांनी लगेच नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. खाकीची धडकफेसबुकवर सुरू झालेल्या या ट्रेंड वर खाकीनेही उडी घेतली आहे. अनेक पोलिसांनी समूहा(ग्रुप)ने आपले खाकीतील फोटो शेअर केले आहे. खाकीचे हे कडक फोटो कमालीचे भाव खाऊन जात आहे. 

टॅग्स :AkolaअकोलाSocialसामाजिक