शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

दर दिवसाआड एक शेतकरी आत्महत्या!

By admin | Updated: August 28, 2015 01:16 IST

नापिकी व कर्जाचा डोंगर; गत महिनाभरात अकोला जिल्ह्यातील १६ शेतक-यांनी कवटाळले मृत्यूला.

अतुल जयस्वाल /अकोला: गत तीन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे राज्यासह जिल्हय़ातील बळीराजा हतबल झाला आहे. सततची नापिकी व डोक्यावर वाढत चाललेल्या कर्जाच्या डोंगरामुळे आर्थिक व मानसिकदृष्ट्या खचून गेलेले शेतकरी टोकाचे पाऊल उचलत असून, जिल्हय़ात गत महिनाभरात तब्बल १६ शेतकर्‍यांनी जीवनयात्रा संपविली आहे. आकडेवारीच्या दृष्टीने दर दिवसाआड एक शेतकरी आत्महत्या झाल्याचे धक्कादायक वास्तव या महिनाभरात समोर आले आहे. जिल्हय़ातील शेती व्यवसाय हा मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. जिल्हय़ात सिंचनाचा मोठा अनुशेष असल्याने शेतकर्‍यांना खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामासाठी पावसावरच अवलंबून राहावे लागते. गत तीन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकर्‍यांना मोठाच फटका बसला आहे. जिल्हय़ात गत तीन वर्षांपासून निसर्गाचा लहरीपणा शेतकर्‍यांसाठी मारक ठरत आहे. वर्ष २0१२-१३ व २0१४-१५ मध्ये अतवृष्टीमुळे शेतकर्‍यांना चांगलेच जेरीस आणले. खरीप हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन, तूर, कपाशी, ज्वारी ही पिके तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा, सूर्यफुल, कांदा व फळबागांचे अतवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले. त्यानंतर गतवर्षी पावसाने दोन्ही हंगामात ह्यखोह्ण दिल्याने समाधानकारक पीक झाले नाही. त्यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक नियोजन कोलमडले. अशातच डोक्यावरचा कर्जाचा बोजा कमी होण्याऐवजी वाढतच गेला. यावर्षीही पावसाने सुरुवातीला समाधानकारक हजेरी लावल्यानंतर दीड महिन्याची दीर्घ दडी मारली. यामुळे पिके करपली व शेतकर्‍यांवर दुबार, तिबार पेरणीचे संकट ओढावले. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला हजेरी लावल्यानंतर पावसाने पुन्हा दडी मारली आहे. यामुळे यावर्षीही पिकांची अवस्था ह्यजेमतेमह्ण असल्यामुळे शेतकर्‍यांचे मनोधैर्य ढळत आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करतानाच डोक्यावरील कर्जाचा डोंगर कसा दूर करावा, या विवंचनेतूनच शेतकरी टोकाचे पाऊल उचलत आहेत. एकट्या ऑगस्ट महिन्यात जिल्हय़ातील १६ शेतकर्‍यांनी आत्महत्येचा पर्याय चोखाळून जीवनयात्रा संपविली आहे. यामध्ये जिल्हय़ातील सातही तालुक्यातील शेतकर्‍यांचा समावेश आहे.