शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

कला व क्रीडा शिक्षणापासून विद्यार्थी वंचित

By admin | Updated: May 22, 2015 01:49 IST

५ हजार ५0५ अंशकालीन शिक्षकांची पदे रिक्त

प्रवीण खेते / अकोला : शासनाने उच्च प्राथमिक शाळांमध्ये कला शिक्षण, शारीरिक शिक्षण, आरोग्य आणि कार्य शिक्षण विषयासाठी अंशकालीन शिक्षकांची नियुक्ती करणे बंधनकारक केल्यावर या भरतीला शिक्षक संघटनांनी विरोध केला. त्यामुळे भरतीला स्थगिती देण्यात आल्याने यंदाच्या शैक्षणिक वर्षातही विद्यार्थ्यांंना सर्वांंगीण विकासाच्या विषयापासून मुकावे लागणार आहे.विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकारान्वये उच्च प्राथमिक शाळांमध्ये १00 विद्यार्थ्यांमागे कला शिक्षण, शारीरिक शिक्षण व आरोग्य आणि कार्य शिक्षण (कार्यानुभव) विषयासाठी अंशकालीन शिक्षकांची नियुक्ती करणे बंधनकारक करण्यात आले. त्या अनुषंगाने राज्य शासनाने ऑगस्ट २0१४ मध्ये परिपत्रक काढून काही वर्षांपासून रिक्त असलेल्या पदांसाठी नोव्हेंबरमध्ये परीक्षा घेण्यात आली. परंतु, या परिपत्रकाला व पद भरतीला कला, क्रीडा व कार्यानुभव शिक्षक संघटनांनी विरोध केला. खासगी तसेच इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद, महानगर पालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा दर्जा खालावला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणारा विद्यार्थी मध्यम कुटुंबातील असून, यात मोठी संख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची आहे. त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून शासनामार्फत सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. शासनाचे हे निर्णय कागदोपत्री चांगले दिसत असले तरी, वास्तवात मात्र परिस्थिती वेगळीच आहे. राज्य शासनाने २१ ऑगस्ट २0१४ रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील कला शिक्षण, शारीरिक शिक्षण व आरोग्य आणि कार्य शिक्षण (कार्यानुभव) विषयाच्या अंशकालीन निदेशकांची नियुक्ती करण्याबाबत परिपत्रक काढले होते. यामध्ये ३0 सप्टेंबर २0१३ च्या युडाईस अहवालानुसार १ हजार ८३५ शाळांमधील ५ हजार ५0५ अंशकालीन निदेशक पदांना मंजुरी दिली. या परिपत्रकानुसार राज्यभरात १0 नोव्हेंबर २0१४ रोजी अंशकालीन निदेशक पदाची परीक्षा घेण्यात आली. परंतु, पूर्वीच्या अर्धवेळ निदेशकांना कायमस्वरूपी करण्याची मागणी अंशकालीन निदेशक संघटनांनी केली. त्यामुळे या पदभरतीला न्यायालयाने स्थगिती दिली. तेव्हापासून ही पदे अद्यापही रिक्त असल्याने यंदाच्या शैक्षणिक वर्षात जिल्हा परिषद व महानगरपालिका, नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासाच्या शिक्षणापासून वंचित राहावे लागणार आहे.