शहरं
Join us  
Trending Stories
1
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
2
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
3
Top Marathi News LIVE Updates: आसाममध्ये पुन्हा 'हिमंत' सरकार; आज शपथविधी
4
Pragya Singh Missing Case: ट्रेनमधून गायब झालेली नवरी सापडली, नवऱ्याच्या जीवात जीव आला! आता रेल्वे प्रशासन म्हणते.. 
5
हिमंता बिस्वा सरमांच्या शपथविधीसाठी एकनाथ शिंदे गुवाहाटीमध्ये, सरमांच्या नेतृत्वाचं कौतुक करत म्हणाले...  
6
भारतात पेट्रोलचा साठा संपणार? इंधनावर कोटा लागू होणार का? केंद्र सरकारने दिलं मोठं उत्तर
7
Prajakta Mali: प्राजक्ता माळीच्या कुटुंबात कोण कोण? अभिनेत्रीने शेअर केला फॅमिली फोटो
8
काय? राकेश बापटसोबत तेजश्री प्रधानच्या लग्नाची उडालेली अफवा, अभिनेता म्हणतो...
9
लग्नानंतर १४ व्या दिवशी नववधूचा मृत्यू; नवरा म्हणतो, "माझ्याशी मजा-मस्करी करत होती, अन्..."
10
जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश
11
रुपयाची ऐतिहासिक घसरण; डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या नीचांकी स्तरावर, जाणून घ्या महत्त्वाची कारणं
12
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
13
Video - "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
14
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
15
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
16
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; आयटी शेअर्सना मोठा फटका, सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
17
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
18
रणवीर सिंहचा ड्रीम प्रोजेक्ट! पडद्यावर साकारणार महादेवाची भूमिका; 'या' पुस्तकावर आधारित सिनेमा
19
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
20
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याची मागणी

By admin | Updated: June 3, 2014 20:52 IST

तेल्हारा शहरात काँक्रीट रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली.

तेल्हारा : शहरात सुरू असलेले घरकुल योजनेंतर्गत श्री शिवाजी मानवता मंदिर ते पाण्याच्या टाकीपर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करून गलिच्छ वस्तीतील इतर कामेसुद्धा विनाविलंब करण्याची मागणी स्थानिक जुन्या शहरातील नागरिकांनी निवेदनाद्वारे केली.
तेल्हारा नगरपरिषदेच्यावतीने एकात्मिक गृहनिर्माण व झोपडप˜ी विकास योजनेंतर्गत गलिच्छ वस्तीमध्ये सिमेंट काँक्रीट रस्त्याची कामे सुरू आहेत. या कामांमध्ये श्री शिवाजी मानवता मंदिर ते पाण्याच्या टाकीपर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम करण्याचे नगरपरिषदेने ठरविले आहे; परंतु या रस्त्याचे काम अद्यापपर्यंत सुरू झालेले नाही. हा रस्ता पाणीपुरवठ्याच्या कामामुळे पाइपलाइन टाकल्याने पूर्ण उखडला आहे. हा जुन्या शहरातील रहदारीचा मुख्य रस्ता असल्यामुळे प्राधान्याने या रस्त्याचे काम सुरू करणे गरजेचे होते; परंतु तसे झालेले नाही. तसेच या घरकुल योजनेंतर्गत जे काही सिमेंट काँक्रीट रस्त्याचे कामे आहेत. तसेच जी काही इतर कामे आहेत, ती गलिच्छ वस्तीतच नियमानुसार करण्यात यावी, अशी मागणी जुने शहरातील नागरिक श्रीराम सुरे, रामभाऊ सोनटक्के, प्रदीप अनुटकोर, विठ्ठल खाडे, ज्ञानदेवराव खाडे, गोपाल सोनोने, गोपाल गावंडे, रामा फाटकर देवीदास तायडे, गजानन सुरे, गिरीष घोडेस्वार, दीपक टिकार, मंगेश मानकर, विठ्ठल खारोडे, गोपाल मामनकार, गणेश खारोडे, भावेश सायानी, गणेश हागे, जगदीश पाठक, दिनेश कांगटे, नीलेश चव्हाण, पुरुषोत्तम जायले, दिनेश काजळे, गजानन पवार आदी नागरिकांनी नगरपरिषदेचे अध्यक्ष व मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन केली. या कामास विलंब लावल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असे निवेदनात नमूद केले आहे. न. प. अध्यक्ष व मुख्याधिकारी तसेच जुने शहरातील नगरसेवक हा रस्ता विनाविलंब सुरू करण्याकरिता काय प्रयत्न करतात, याकडे संपूर्ण शहरावासीयांचे लक्ष लागले आहे.