शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

सासूची जाळून हत्या करणारी सून व तिची आई दोषी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 10:42 IST

Crime News सून व सुनेची आई या दोघींना प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयाने सोमवारी दोषी ठरवले.

अकोला : जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवसेना वसाहत येथे पार्वताबाई गंगावणे यांच्या अंगावर पेटलेले कापड फेकून त्यांना जाळून मारल्याप्रकरणी त्यांची सून व सुनेची आई या दोघींना प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयाने सोमवारी दोषी ठरवले. या दोघींना दहा मार्च रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

शिवसेना वसाहत मधील बजरंग चौक येथील रहिवासी पार्वताबाई गंगावणे (वय ६५) या २२ ऑक्टोेबर ी२०१३ ला घरासमोर असताना त्यांची सून मंगला रत्नाकर गंगावणे व मंगलाची आई शोभा मुळे यांनी पेटलेले कापड पार्वताबाई गंगावणे यांच्या अंगावर घेफेकले होते. त्यामुळे पार्वताबाई या ५५ टक्के जळल्या होत्या. नागरिकांनी त्यांना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. २१ नोव्हेंबर रोजी पार्वताबाई यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांनी मृत्युपूर्व बयाणात सून मंगला गंगावणे मंगलाची आई शोभा मुळे यांनी पेटलेले कापड अंगावर फेकून जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याचे बयाणात नमूद केले होते. यावरून जुने शहर पोलिस ठाण्यात मंगला गंगावणे व शोभा मुळे यांच्याविरद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०४, ०, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याची सुनावणी प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश भालेराव यांच्या न्यायालयात झाली. यादरम्यान मृत पार्वताबाईचा मुलगा व मुलगी न्यायालयात फितूर झाले; मात्र तत्कालीन तहसीलदार व तपास अधिकारी यांची साक्ष महत्त्वाची ठरल्याने मायलेकींना न्यायालयाने सोमवारी दोषी ठरविले आहे. या दोन्ही आरोपींना बुधवार १० मार्च रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी