शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर व रुग्णाच्या नातेवाइकांमध्ये हाणामारी

By admin | Updated: April 3, 2015 02:31 IST

अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील घटना; परस्परांविरुद्ध तक्रारी, डॉक्टरांची पोलिसांविरोधात नारेबाजी.

अकोला- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सवरेपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या रुग्णाचे नातेवाईक व वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणारे प्रशिक्षु डॉक्टरांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली. वैद्यकीय महाविद्यालयात गुरुवारी रात्री ११ पासून तर मध्यरात्री २ पर्यंत हा प्रकार सुरू होता. त्यानंतर सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात परस्परांविरुद्ध तक्रारी करण्यात आल्या. गांधीग्राम येथील रहिवासी प्रकाश महादेव अढाऊ गुरुवारी रात्री एका अँपेमध्ये घराकडे जात असताना त्यांच्या वाहनाला भरधाव जाणार्‍या एका वाहनाने धडक दिली. त्यामुळे प्रकाश अढाऊ यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सवरेपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टर उपचार करण्यास दिरंगाई करीत असल्याचा आरोप करीत अढाऊ यांच्या नातेवाइकांनी डॉ. वैशाली रामदास माटे या विद्यार्थिनीस मारहाण केली. वैद्यकीय महाविद्यालयाच्या काही डॉक्टरांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, अढाऊ यांचे नातेवाईक व काही प्रशिक्षु डॉक्टरांमध्ये हाणामारी झाली. यामध्ये डॉ. शशिकांत मेडशीकर, डॉ. वैशाली माटे, डॉ. जुगल, डॉ. नवीन गायधने, डॉ. दळवी यांच्यासह आणखी काही विद्यार्थी जखमी झाले, तर डॉक्टरांनीही अढाऊ यांच्या नातेवाईकांना मारहाण केल्याने प्रकाश अढाऊ यांची मुलगी, एक वृद्ध आणि आणखी चार जण जखमी झाले. डॉक्टर व रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांना मिळताच तब्बल २00 ते २५0 विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन रुग्णाच्या नातेवाइकांवर कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, साहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, सिटी कोतवालीचे ठाणेदार अनिरुद्ध अढाऊ हे पोलीस ताफ्यासह सवरेपचार रुग्णालयात दाखल झाले. विद्यार्थ्यांनी पोलिसांविरुद्ध घोषणाबाजी करीत रुग्णाच्या नातेवाइकांवर कठोर कारवाईची मागणी केली. या प्रकरणी वैशाली माटे हिने दिलेल्या तक्रारीवरून अढाऊ कुटुंबीयांविरुद्ध, तर अढाउ यांच्या तक्रारीवरून वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.