शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट यंदाही कायमच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यंदाचा गणेश उत्सवसुद्धा साधेपणाने साजरा करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना शासनाने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यंदाचा गणेश उत्सवसुद्धा साधेपणाने साजरा करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना शासनाने जारी केल्या आहेत. त्यामुळे गणेशभक्तांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

यंदाही गणरायाची प्रतिष्ठापना, तसेच विसर्जनाच्या मिरवणुकांना बंदी असेल. सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करता येणार नाही. सार्वजनिक मंडळाची मूर्ती ४ फूट आणि घरगुती गणपतीची मूर्ती २ फुटांपेक्षा अधिक उंच असू नये, असेही गृहविभागाने म्हटले आहे. कोरोनासंदर्भात प्रशासनाने लागू केलेल्या निर्बंधांमध्ये गणेशोत्सव काळात कोणतीही सूट दिली जाणार नाही. गेल्या वर्षीही गणपती मूर्तींच्या उंचीबाबत मर्यादा होती. गणेशोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम, रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे. आरती, भजन किंवा इतर धार्मिक कार्यक्रमांना गर्दी होणार नाही व ध्वनिप्रदूषणही होणार नाही, याची काळजी मंडळांना घ्यावी लागेल. यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती किंवा सार्वजनिक मंडळांनी भपकेबाज सजावटी करू नयेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. यंदा शक्यतो संगमरवरी किंवा धातूंच्या गणेशमूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची असेल तर शक्यतो घरीच विसर्जन करावे. ते शक्य नसेल तर नजीकच्या कृत्रिम विसर्जनस्थळी ते करावे. असे नियम घालून देण्यात आले असून, यामुळे गणेशभक्तांत नाराजी आहे.