शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
3
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
4
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
5
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
6
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
7
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
8
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
9
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
10
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
11
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
12
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
13
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
14
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
15
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
16
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
17
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
18
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
19
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
20
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज देण्याच्या नावाखाली हजारोंचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 11:00 IST

फसवणूक झालेल्या तरुणाने पोलिसांत तक्रार दिली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आलेगाव : तीन लाखांचे कर्ज सहज उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली आलेगाव येथील एका सुशिक्षित बेरोजगार तरुणाची हजारो रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी फसवणूक झालेल्या तरुणाने पोलिसांत तक्रार दिली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सौरभ दत्तात्रय भडांगे याने पशुवैद्यकीय व्यवस्थापन क्षेत्रात शिक्षण घेतले आहे. सध्या तो स्पर्धा परीक्षेची तयारी करतो. दरम्यान, वृत्तपत्रात जाहिरातींमध्ये त्याला सहज कर्ज उपलब्ध होण्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन करणारी जाहिरात दिसली. जाहिरातीनुसार सौरभ याने १४ नोव्हेंबर रोजी एका मोबाइलवर संपर्क केला. त्याने पशुपालनासाठी ३ लाखांचे कर्ज हवे असल्याचे सांगितल्यानंतर त्याला व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून कागदपत्रे पाठविण्याचे सांगण्यात आले. त्यानुसार त्याने कागदपत्र पाठविल्यानंतर पुढील आठवड्यात त्याला कर्ज मंजूर झाले असून, त्यासाठी १० हजार रुपये जमा करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर कर्जाची रक्कम मोठी असून, जीएसटी भरण्यासाठी ११ हजार २०० रुपयांचा धनाकर्ष पाठविण्याचे सांगण्यात आले. लगेच दुसऱ्या दिवशी कर्ज मंजूर झाले असले तरीही त्यासाठी विमा आवश्यक असून, त्याकरिता ९ हजार २५० रुपये पाठविण्याचे सांगण्यात आले.२६ नोव्हेंबरपर्यंत सौरभने ३२ हजार ९५० रुपये नागपूर येथील पंडित शेषराव झाटे याच्या खात्यात भरले. त्यानंतर कर्ज मंजूर झाले असून, दोन-चार दिवसात पैसे मिळतील, असे सौरभला सांगण्यात आले; मात्र तेव्हापासून सौरभला देण्यात आलेला मोबाइल क्रमांक बंद असल्याने फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. या सगळ्या प्रकारानंतर अखेर सौरभने चान्नी पोलिसांत तक्रार दिली आहे. चान्नी पोलिसांनी या प्रकरणणी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ४२० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार गणेश वनारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामराव राठोड, गजानन पोटे सुनील भाकरे करीत आहेत.  अनेक युवकांचा समावेशसुशिक्षित बेरोजगार युवकांना कर्ज देण्याबाबत त्यांच्याशी संपर्क साधणाºयाने केवळ सौरभ भडांगे यालाच फसविले, असे नाही. सौरभसारखे अनेक बेरोजगार तरुण या सापळ्यात अडकले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी तातडीने तपास करणे गरजेचे आहे.नागरिकांनी आॅनलाइन व्यवहार करताना खबरदारी घेणे आवश्यक आहे. खात्री करूनच व्यवहार करावा. सौरभ भडांगे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.- गणेश वनारे,ठाणेदार, चान्नी

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी